मुंबई : अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा केला आहे. आमिर खानच्या मुलीने याबाबतचा एक व्हीडिओ केला आहे. त्यात इराने आपल्यावर 14 वर्षाची असताना अत्याचार झाल्याचं म्हटलं आहे. इराने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
आमिर खानची मुलगी इरा खानने जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना निमित्तानं पोस्ट केलेल्या व्हीडिओत धक्कायदायक गौप्यस्फोट केले आहेत. लैंगिक अत्याचार झाल्यानं आपण काही काळ नैराश्यात होतो असंही तिनं म्हटलं आहे. इरा ही आमिर खान आणि रिना दत्ताची मुलगी आहे.
आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या घटना घडत गेल्या ज्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत होता. हळूहळू मी गर्दीत असूनही स्वत:ला एकटी समजू लागले होते, इरानं इंग्लिशमध्ये हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. नंतर त्याचं हिंदी भाषांतरही इराने केले आहे.
इरा म्हणाली, मी लहान होते तेव्हा माझ्या आईवडीलांनी घटस्फोट घेतला. परंतु त्यांच्या घटस्फोटाचा माझ्यावर परिणाम झाला नाही. कारण माझे पालक परस्पर संमतीने विभक्त झाले होते. ते आजही चांगले मित्र आहेत. माझ्या आई-वडीलांचा घटस्फोट, मी 14 वर्षांची असताना माझ्यावर झालेले लैंगिक अत्याचार या घटनांचा नकळत परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी मित्रांसोबत बाहेर जाणं टाळायचे. मी दिवसांतील बराचसा वेळ केवळ झोपून काढायचे. गर्दीत असूनही मी स्वत:ला एकटी समजू लागले. शेवटी एक वेळी आली जेव्हा मी ड्रिप्रेशनमध्ये असल्याची जाणीव मला झाली.
संबंधित बातम्या :