hridayapoorvam box office collection day 1 : मल्याळम चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांचा कौटुंबिक ड्रामा चित्रपट ‘हृदयपूर्वम’ नुकताच 28 ऑगस्टला प्रदर्शित झाला. ‘हृदयपूर्वम’चे दिग्दर्शन सथ्यान अंतिक्कड यांनी केले असून हा एक कौटुंबिक ड्रामा आहे, ज्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘हृदयपूर्वम’चे ओपनिंग डे कलेक्शन अपेक्षेपेक्षा जास्त झाले असून त्याने ‘लोका चॅप्टर 1’ या चित्रपटाला कमाईत मागे टाकले आहे. मोहनलाल यांचा 2025 या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. पाहूया, ‘हृदयपूर्वम’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली.
हृदयपूर्वमची पहिल्या दिवशीची कमाई
‘हृदयपूर्वम’ची थेट टक्कर ‘लोका चॅप्टर 1’ या सुपरवुमन फिल्मशी झाली होती. चित्रपटात मोहनलाल मुख्य भूमिकेत असून त्याचा ओपनिंगला मोठा फायदा झाला. चित्रपटसृष्टी ट्रॅकर सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘हृदयपूरवम’ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 3.35 कोटी रुपये कमावले. मात्र मोहनलालचा याच वर्षी आलेल्या चित्रपट ‘थंडरम’च्या तुलनेत हे कलेक्शन कमी आहे. थंडरमने एप्रिल महिन्यात प्रदर्शित होताच 5.25 कोटी रुपयेची ओपनिंग घेतली होती. तर ‘लोका चॅप्टर 1’ ने पहिल्या दिवशी 2.62 कोटी रुपये कमावले होते. विशेष म्हणजे, ‘हृदयपूर्वम’ने बुधवारी रिलीजपूर्वीच अॅडव्हान्स बुकिंगमधून 1 कोटी रुपये कमावले होते. त्यामुळे हा चित्रपट सुपरवुमन फिल्मपेक्षा जास्त कमाई करेल हे निश्चित झाले होते. (hridayapoorvam box office collection day 1)
मोहनलालच्या 2025 सालातील टॉप ओपनिंग फिल्म्स
एल 2 : एम्पुरण – 21 कोटी रुपये
थंडरम – 5.3 कोटी रुपये
हृदयपूर्वम – 3.25 कोटी रुपये
बाजुका – 3.2 कोटी रुपये
एलेप्पुझा जिमखाना – 2.75 कोटी रुपये
हृदयपूर्वम बद्दल जाणून घेऊयात..
या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये मोहनलाल सोबत मालविका मोहनन आणि संगीत प्रताप महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. कथा एका मध्यमवयीन व्यक्ती संदीपभोवती फिरते, ज्याने हार्ट ट्रान्सप्लांट केलेले असते. तो पुण्यात त्या कुटुंबाला भेटण्यासाठी जातो, ज्यांच्या एका सदस्याचे हृदय आता त्याच्या छातीत धडधडत असते. त्याच वेळी तो त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यालाही उपस्थित राहतो. (hridayapoorvam box office collection day 1)
इतर महत्त्वाच्या बातम्या