Jaya Bachchan VIDEO : बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या नेहमीच पॅपराझी आणि फॅन्सवर केलेल्या कठोर टिपण्ण्यांमुळे चर्चेत राहतात. कॅमेरे पाहून वारंवार भडकणाऱ्या जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन हसताना दिसत आहेत आणि पापाराझींना अगदी प्रेमळ शब्दात बोलताना दिसत आहे. शिवाय फोटो काढण्यापासूनही रोखत देखील नाहीत. या व्हिडीओमध्ये जया बच्चन आपल्या याच वागण्याबद्दल एकप्रकारे ‘यू-टर्न’ घेत आपली बाजू मांडताना दिसत आहेत. 

Continues below advertisement

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जया बच्चन यांचा हा व्हिडीओ जुना आहे. अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या एका कार्यक्रमाला त्या पोहोचल्या होत्या, जिथे त्यांनी हसत पापाराझींसमोर पोझ दिल्या. त्यानंतर कॅमेऱ्यासमोर जाऊन आपल्या रागाबद्दल पाापाराझींशी चर्चा केली.

Continues below advertisement

"मी फोटो देण्यासाठी तयार असते पण…"

नेहमीप्रमाणे पापाराझी जया बच्चन यांचे फोटो काढण्यासाठी सज्ज होते. पण जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात जया बच्चन यांनी नाराजी दाखवण्याऐवजी काही वेगळं केलं. त्यांनी केवळ पोझ दिल्या नाहीत, तर त्यांच्या जवळ जाऊन आपली बाजूही स्पष्ट केली. व्हिडीओमध्ये जया म्हणतात – "आता काय आहे, जेव्हा असं होतं (सिस्टेमॅटिक फोटो) तेव्हा मी फोटो देण्यासाठी तयार असते. जेव्हा वैयक्तिक गोष्टींमध्ये असते आणि तुम्ही लोक लपून-छपून फोटो काढता, ते मला आवडत नाही."

जया यांच्या या गोष्टी ऐकल्यानंतर जेव्हा एका पॅपराझीनं आपल्या साथीदाराला इनफॉर्मल चॅट रेकॉर्ड करणं थांबवायला सांगितलं, तेव्हा जयांनी हसत त्याला शांत राहायला सांगितलं आणि पुढे म्हणाल्या – "जेव्हा मी तयार असते तेव्हा ठीक आहे… पण जेव्हा मी तयार नसते आणि तुम्ही फोटो काढत."

जया बच्चन यांचा हा यू-टर्न पाहून सोशल मीडियावर युजर्स जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. जया बच्चन यांचं ‘हृदयपरिवर्तन’ पाहून नेटिझन्सनी त्यांची खिल्ली उडवली. अनेक युजर्सनी तर इथपर्यंत म्हटलं की, कदाचित त्यांच्या सुपरस्टार पतींनी त्यांना समजावलं असेल. एका युजरने लिहिलं – "अमिताभ बच्चन यांनी क्लास घेतली आहे." तर दुसऱ्यानं लिहिलं – "फायनली याचं डोकं जाग्यावर आलंय…" हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

जया बच्चन यांचं करिअर

जया बच्चन या सध्या आपल्या राजकीय जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त आहेत. त्या समाजवादी पक्षाच्या तर्फे राज्यसभेच्या खासदार आहेत आणि सामाजिक मुद्द्यांवर बेधडक भूमिका मांडण्यासाठी ओळखल्या जातात. चित्रपट करिअरबद्दल बोलायचं झालं तर, जया बच्चन शेवटच्या वेळेस करण जोहरच्या "रॉकी और रानी की प्रेम कहानी" या चित्रपटात दिसल्या होत्या, ज्यामध्ये त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मल्याळम भाषेतील 'हृदयपूर्वम' सिनेमाने रजनीकांच्या 'कुली'ची हवा काढली, 'लोका चैप्टर 1' कडून तगडी फाईट, तीन दिवसांची कमाई एका क्लिकवर