Holi 2024 Top 10 Marathi Songs : होळीचा (Holi 2024) सण अवघ्या काही दिवसांवर आलाय. त्यातच होळी आणि धुळवड या सणाची उत्सुकता प्रत्येकाला असते. रंगात न्हाऊन जाणं, आपल्या माणसांसोबत सण साजरं करणं हे प्रत्येकालच हवंहवंस असतं. होळीच्या दिवशी पुरणपोळीवर ताव मारुन झाल्यावर धुळवडीला रंगात रंगण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. तसेच या सणाला गाण्याच्या (Top 10 Marathi Songs for Holi) तालावर थिरकणंही कोणी सोडत नाही. 


यंदाच्या धुळवडीला रंगात न्हाऊन जाताना कोणत्या मराठी गाण्यांवर तुम्ही ठेका धरु शकता याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. या यादीमध्ये सगळ्यात पहिलं गाणं सगळ्यांच्या तोडीं येतं ते खेळताना रंग बाई होळीचा. या लावणीने मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर यामध्ये अगदी हल्ली आलेल्या माऊली या चित्रपटातील धुवून टाक या गाण्याच देखील समावेश आहे. 


1. आली रे आली पंचिम आली (सुशीला)


ब्लॅक अँड व्हाईट काळामधलं हे गाणं आजही तितकच प्रेक्षकांच्या आवडीचं आहे. आजच्या पिढीला फारसं माहिती नसलेलं  सुशिला या चित्रपटातील आली रे आली पंचिम आली हे गाणं होळीसाठी विशेष प्रसिद्ध आहे.  अशोक सराफ आणि रंजना यांची सदाबहार जोडी या चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत माने यांनी केलं आहे आणि राम कदम यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. 


2. होळी आली (कळतंय पण वळत नाही)


लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कळतंय पण वळत नाही या चित्रपटांतील होळी आली हे गाणं आहे. पूर्णिमा पाटणेकर, निळू फुले आणि संजीवनी राठोड ही कलाकार मंडळी या चित्रपटात 


3. खेळताना रंग बाई होळीचा


ज्येष्ठ लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांच्या आवाजत संगीतबद्ध झालेलं हे गाणं आहे. खेळताना रंग बाई होळीचा या गाण्याने प्रेक्षकांनाही तितकीच भुरळ पाडली. आजही मराठी गाण्यांवर थिरकताना हे गाणं आवर्जुन वाजवलं जातं. 


4. अगं नाच नाच राधे उधळूया रंग (गोंधळात गोंधळ)


‘गोंधळात गोंधळ' हा चित्रपट जितकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो तितकचं त्यातील गाणीही प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस उतरतात. याच चित्रपटातील अगं नाच नाच राधे उधळूया रंग हे गाणं  सुरेश वाडकर यांनी गायलं आहे.  रविंद्र महाजनी, रंजना देशमुक आणि अशोक सराफ ही कलाकार मंडळी या चित्रपटात पाहायला मिळतात. 


5. सख्या चला बागामंदी रंग खेळू चला (सामना)


उषा मंगेशकर यांच्या आवाजात संगीतबद्ध झालेलं सख्या चला बागामंदी रंग खेळू चला हे गाणं सामना या चित्रपटातील आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन जब्बार पटेल केलंय. त्याचप्रमाणे या चित्रपटात विजय तेंडुलकर, मोहन आगाशे, निळू फुले, श्रीराम लागू, स्मिता पाटील आणि विलास रकाटे या दिग्गज कलाकारांनी अभिनयाची धुरा सांभाळली होती. 


6. आज गोकुळात रंग खेळतो हरी


श्रीकृष्ण आणि राधेच्या गोकुळातील लिलांवरील हे गाणं गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजत संगीतबद्ध करण्यात आलं आहे. सर्व संगीतप्रेमींच्या पसंतीस पडणारं हे गाणं खास रंगपंचमीच्या सणासाठी तयार करण्यात आलंय. 


7. चला होळीचा खेळाला रंग (चष्मेबहाद्दर)


चष्मेबहाद्दर या चित्रपटानं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. या चित्रपटातील हे होळीच्या सणामध्ये आणखी धम्माल आणू देतं.  संजय नार्वेकर, पूर्णिमा अहिरे, पूजा अजिंक्य, किशोरी अंबिये, अविनाश बब्बर, गणेश भागवत, जयवंत भालेराव, नरेश बिडकर, विजय चव्हाण, अवतार गिल, रसिका जोशी, जॉनी लिव्हर, दिपाली सय्यद, दिपक शिर्के, साहिल शिरवळकर आणि राजपाल यादव अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमांत होती. विजय पाटकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती.


8. आला होळीचा सण लई भारी (लय भारी)


लय भारी या गाजलेल्या चित्रपटातली गाणीही तितकीच गाजलीत. लय लय भारी… असं म्हणत आला होळीचा सण लई भारी हे गाण देखील प्रेक्षकांच्या तितकचं पसंतीस उतरलं.  अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री राधिका आपटे आणि गेस्ट अपिअरन्समधील जेनेलियामुळे हे गाणं विशेष प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.  या गाण्याला संगीत दिलं आहे प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी. तसंच हे गाणं गायलं आहे स्वप्नील बांदोडकर आणि योगिता गोडबोले यांनी. 


9. धुवून टाक (माऊली)


रितेश देशमुखच्या माऊली या चित्रपटातीलच हे गाणं आहे. या गाण्याला देखील  अजय-अतुल या संगीत जोडीनेच संगीतबद्ध केलं आहे. 


10. सण आयला गो


होळी पोर्णिमेला नारळी पोर्णिमा देखील म्हटलं जातं. त्यामुळे यासाठी सण आयला गो हे कोळीगीत विशेष प्रसिद्ध आहे. 


ही बातमी वाचा : 


Ankita Lokhande : 'थोडं तरी भान ठेवा,आधी बाहेर व्हा','स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या प्रिमियमदरम्यान अंकिता लोखंडे पापाराझींवर भडकली