Hindu Muslim unity video : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील प्रसिद्ध रीलस्टार अथर्व सुदामे (Atharva Sudame) याने गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवणारा व्हिडीओ बनवला होता. तो व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. मात्र, काही वेळानंतर त्याला धमक्या आल्या. त्यामुळे अथर्व सुदामे (Atharva Sudame) याने धमक्यांना घाबरुन हा व्हिडीओ डिलिट केला. मात्र, अथर्व सुदामेचा (Atharva Sudame) व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळाला. शिवाय, त्याला घाबरु नको, असं म्हणत अनेक राजकीय नेतेमंडळींनी त्याला पाठिंबा देखील दिला. दरम्यान, आता अथर्व सुदामे याचा मित्र डॅनी पंडित (dannyy pandit) याने हिंदू मुस्लिम ऐक्यावर एक व्हिडीओ बनवला असून तो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. (Hindu Muslim unity video)
रोहित पवार यांनी देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यावेळी कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं की, धार्मिक सलोखा आणि बंधुभावाची होळी करुन त्यावर आपल्या स्वार्थाच्या भाकरी शेकणाऱ्यांना अजून एक दणका..! जातीयवाद्यांच्या नाकावर टिच्चून #महाराष्ट्र_धर्माला आणि भागवत संप्रदायाला साजेसा व्हिडीओ केल्याबद्दल शाब्बास आणि Thank U डॅनी…! असं धाडस दाखवणं आज महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. (Hindu Muslim unity video)
अथर्व सुदामे याने घाबरुन व्हिडीओ डिलीट केला असला तरी त्याचा मित्र असलेल्या डॅनी पंडितने हा विषय आणखी चांगल्या पद्धतीने हाताळल्या सोशल मीडियावर चर्चा आहे. डॅनी पंडितने हा व्हिडीओ शेअर करताना 'हे सत्य घटनेवर आधारीत आहे', असं कॅप्शन देखील दिलं आहे. (Hindu Muslim unity video)
इतर महत्त्वाच्या बातम्या