Kabhi Khushi Kabhie Gham Actress Blessed With Daughter: बॉलिवूडचा (Bollywood News) गाजलेला सिनेमा 'कभी खुशी कभी गम'मध्ये (Kabhi Khushi Kabhie Gham) पू म्हणजेच, करिना कपूरची भूमिका खूपच गाजलेली. 'कभी खुशी कभी गम'मध्ये करीना कपूरच्या (Kareena Kapoor) बालपणीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री आता आई झाली आहे. 'कभी खुशी कभी गम'मध्ये काजोलच्या लहान बहिणीची भूमिका अभिनेत्री मालविका राजनं (Malvika Raaj) साकारली होती. तेव्हाच्या त्या लहानग्या मालविकानं आता एका चिमुकलीला जन्म दिला आहे. 

Continues below advertisement

मालविकानं पती प्रणव बग्गासोबत सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. मालविका 23 ऑगस्ट रोजी तिनं गोंडस मुलीला जन्म दिला. मालविकानं 29 नोव्हेंबर 2023 रोजी गोव्यात तिचा जवळचे नातेवाईक आणि कुटुंबाच्या उपस्थितीत बिझनेसमन प्रणव बग्गासोबत डेस्टिनेशन वेडिंग केलं. लग्नापूर्वी मालविका आणि प्रणव 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

मालविकानं दिली गूड न्यूज

मालविकानं तिच्या आनंदाची बातमी पोस्टमध्ये फुग्यांनी भरलेली गुलाबी पोस्टर शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना या जोडप्यानं लिहिलंय की, "आमची मुलगी या जगात आली आहे...'. पोस्टमध्ये मुलीची जन्मतारीख देखील आहे. मालविका-प्रणवनं शेअर केलेल्या या आनंदाच्या बातमीवर, त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी प्रेमाचा वर्षाव करू लागले आहेत आणि अभिनंदन करत शुभेच्छाही देत आहेत. मालविकाच्या गुड न्यूज पोस्टला 15 हजारांहून अधिक लाईक्स मिळालं आहेत. 

Continues below advertisement

जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव 

अभिनेत्री प्रज्ञा जयस्वाल, आयशा श्रॉफ, भाग्यश्रीसह अनेक सेलिब्रिटींनी मालविका आणि प्रणव यांना पालक झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मालविकानं मे महिन्यात सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. अभिनेत्रीनं तिचा पती प्रणवसोबत एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये अभिनेत्रीनं प्रेग्नन्सी किट देखील दाखवली होती. पोस्टमध्ये मम्मी-पापा असं लिहिलं होतं आणि त्याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीनं लिहिलेली की, तू + मी = 3. त्याच वेळी, आज 25 ऑगस्ट रोजी, बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनीही त्यांच्या चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे.

जोडप्यानं त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लवकरच आई-बाबा होणार असल्याची घोषणा केलेली. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसापूर्वीच जोडप्यानं गूड न्यूज दिली आहे. दरम्यान, परिणीती आणि राघव 24 सप्टेंबर 2023 रोजी लग्नबंधनात अडकले होते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Parineeti Chopra Announces Pregnancy: लग्नाच्या दोन वर्षांनी परिणीती-राघव चड्ढांकडे आनंदाची बातमी; गोळाबेरीज करुन शेअर केली गूड न्यूज