Hemant Dhome On Hindi Language In Marathi Schools: महाराष्ट्रात (Maharashtra News) आता हिंदी भाषेवरून (Hindi Sakti) नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्याचं कारण आहे, इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करण्याचा निर्णय सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला (National Education Policy) अनुसरून येत्या शैक्षणिक वर्षापासून (Academic Year) टप्प्याटप्प्यानं बदल लागू करण्यात येणार आहेत. त्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, मराठी आणि इंग्रजीसोबत (English Language) हिंदी सक्तीच्या (Hindi Language) निर्णयाचा. त्यावरून राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) संघर्षाचा इशारा दिला आहे. त्यामुळे हिंदीसक्तीची दिशा कशी असेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. हिंदी सक्तीला होणाऱ्या वाढत्या विरोधानंतर हिंदी शिकवण्यासाठी 'अनिवार्य' शब्द मागे घेण्यात आला असून आता हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंदीऐवजी इतर भाषा शिकायची असेल तर 20 हून अधिक विद्यार्थी हवेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
हिंदी भाषा शिकवण्यासाठी करण्यात आलेल्या सक्तीवर मराठी चित्रपट निर्माता आणि अभिनेता हेमंत ढोमेने म्हणाला की, "हिंदी सक्ती मागे घेतली असं वाटणाऱ्या सर्वांसाठी! कृपया हा जीआर नीट वाचा… हिंदी ही तृतीय भाषा असेल… ज्यांना अन्य भाषा शिकायची इच्छा असेल त्यासाठी किमान 20 इच्छुक विद्यार्थी हवेत… (हा काय नियम आहे?) म्हणजे तिसऱ्या आणि त्यातही हिंदी भाषेची सक्ती असेल हे सरकारने ठामपणे सांगितलेले आहे… पहिल्या इयत्तेतल्या मेंदूला किती ताण देणार? आणि का? मातृभाषा मजबूत करण्यावर जोर का नाही?"
"एक देश, एक भाषा! असं करायचं ठरवलंच आहे तर… पडद्यामागून येणाऱ्या या सक्तीचा कडाडून निषेध! आता तुम्हीच ठरवा, नेमकं काय अभिजात होतंय?", असंही ट्वीटमध्ये हेमंत ढोमे म्हणाला आहे. तसेच, पोस्टसोबतच हेमंत ढोमेनं #महाराष्ट्रात_मराठीच असा हॅशटॅगही शेअर केला आहे.
दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द मागे घेण्यात आला आहे. मात्र, तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अवलंबलं जाणार आहे. हिंदीऐवजी तिसरी भाषा शिकायची असल्यास वर्गामध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी इतर भाषा विषय शिकण्याची इच्छा दर्शवणं गरजेचं असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :