Housefull 5 Box Office Collection Day 12: अक्षय कुमारचे (Akshay Kumar) पाय सध्या जमिनीवर नाहीतच, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अक्षयचा नुकताच प्रदर्शित झालेला 'हाऊसफुल 5' (Housefull 5) सध्या थिएटर्समध्ये धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या 12 दिवसांनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) थांबत नाहीये आणि छप्पडफाड कमाई करत आहे. 'हाऊसफुल 5'नं या 12 दिवसांत अनेक रेकॉर्ड मोडलेत आणि हा चित्रपट आता आपल्या नावावर आणखी एक रेकॉर्ड रचण्याच्या तयारीत आहे.

'हाऊसफुल 5'च्या आतापर्यंतच्या कलेक्शनवर नजर टाकली तर, पहिल्या दिवशी चित्रपटानं 24.35 कोटी रुपयांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शननं सुरुवात केली. पहिल्या आठवड्यात या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 133.58 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आठव्या दिवशी 6.60 कोटी रुपये, नवव्या दिवशी 10.21 कोटी रुपये आणि दहाव्या दिवशी 12.21 कोटी रुपये कमावले. अकराव्या दिवशी 'हाऊसफुल 5'चं कलेक्शन 3.80 कोटी रुपये होतं.                    

'हाऊसफुल 5'च्या नावावर आणखी एक विक्रम

आता 'हाऊसफुल 5'च्या बाराव्या दिवसाच्या कलेक्शनचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या मते, चित्रपटानं आतापर्यंत (रात्री 11 वाजेपर्यंत) 4 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह, चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 170.49 कोटी रुपये झालं आहे. आता 'हाऊसफुल 5' अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. 'रेड 2'नं भारतात एकूण 172.75 कोटी रुपये कमावले होते आणि यासह हा 2025 सालचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

2025 सालचे पाच मोठे चित्रपट

2025 सालच्या 5 मोठ्या चित्रपटांमध्ये, 'छावा' अजूनही पहिल्या स्थानावर आहे. विक्की कौशल स्टारर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकूण 601.57 कोटी रुपये कमावले आहेत. 'रेड 2' दुसऱ्या स्थानावर, 'हाऊसफुल 5' तिसऱ्या स्थानावर, 'सिकंदर' (110.50 कोटी) चौथ्या स्थानावर आणि स्काय फोर्स (131.20 कोटी) पाचव्या स्थानावर आहे.

दरम्यान, साजिद नाडियाडवालाच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेला 'हाऊसफुल 5' हा चित्रपट तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, नाना पाटेकर, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, सोनम बाजवा आणि नर्गिस फाखरी यांसारखे कलाकार झळकले आहेत.