Horoscope Today 17 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 18 जून 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज घरामध्ये धार्मिक कार्यामध्ये आनंदाने सहभागी व्हाल, त्यासाठी पडलेल्या कष्टाचे काही वाटणार नाही 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज फिरतीची नोकरी असणाऱ्यांना ती मानवेल, महत्वाचे निर्णय घेताना गंभीर निश्चय धोरणी बनाल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज तरुण वर्ग प्रेम प्रकरणांमध्ये अडकेल, कोणत्याही कागदपत्रात पत्रांमध्ये काही अडचणी येत असतील, तर स्त्रियांच्या मध्यस्थीने  कामे मार्गी लागतील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आर्थिक घडी व्यवस्थित बसेल, जोडीदाराची महत्त्वाची कामे होतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल, त्यांनी पथ्य पाणी पाळणे आवश्यक, औषध पाणी आहार विहार व्यवस्थित ठेवायला हवा. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज संधी आहे ती ओळखा आणि कामाला लागा 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांना कुटुंबात तारेवरची कसरत करावी लागेल, विवाह करायचा आहे त्यांचे विवाह जमतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आपल्यासाठी योग्य जोडीदार निवडण्यात यशस्वी व्हाल, घरामध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी केली जाईल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज आर्थिक घडी चांगली बसल्यामुळे खुश राहाल, घरामधील आनंदी वातावरण तुम्हाला मन स्वास्थ्य देईल.  

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज थोडा तापटपणा बाजूलाच ठेवल्यास सर्व गोष्टी सुरळीत होतील, अस्थिर आणि चंचल मनोवृत्तीमुळे कोणतेही निर्णय घेण्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही समस्येपेक्षा आपलं जीवन खूप महत्त्वाचे असते, हे लक्षात ठेवून तुमच्यातील चांगल्या गुणांचा आढावा घेतल्यास सुखावह होईल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज महिला जे ठरवतील, ते पार पाडतील, घरामध्ये थोडे संघर्षात्मक वातावरण राहील.

हेही वाचा :                          

Grahan Yog 2025: 18 जूनपर्यंत मोठा धक्का बसणार, राहू-चंद्राचा धोकादायक योग, 5 राशींचा कठीण काळ सुरू, पुन्हा दुर्घटना? काळजी घ्या...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)