Sanjay Leela Bhansali On Heeramandi : प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. संजय लीला भन्साळी हे ऐतिहासिक आणि सुपरहिट चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आगामी हीरामंडी (Heeramandi) या वेबसिरीजमधून ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहेत. नुकताच हीरामंडीचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हीरामंडीचा फर्स्ट लूक चाहत्यांना फार आवडतोय.
इतर चित्रपटांच्या निर्मितीत व्यस्त होते संजय लीला भन्साळी
हीरामंडीच्या टीझर लॉन्च कार्यक्रमादरम्यान, संजय लीला भन्साळी यांनी या वेबसीरिजबद्दल मीडियाशी संवाद साधला. या दरम्यान ते म्हणाले की, 'मी मोईन बेगचे आभार मानतो. त्यांनी मला ही कल्पना 14 वर्षांपूर्वीच दिली होती, पण त्या काळात मी 'देवदास'वर काम करत होतो. त्यानंतर 'बाजीराव मस्तानी' आला. यासाठीच हीरामंडीच्या कथेकडे लक्ष देऊ शकलो नाही. त्यानंतर एके दिवशी मोईन माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितले की, गेल्या 30 वर्षांत त्यांनी 10 चित्रपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय अलीकडच्या काळात तीन चित्रपटांची निर्मिती झाली आहे. ते म्हणाले की, हीरामंडीसारख्या विषयाला फार मागणी आहे. यामध्ये अनेक ट्रॅक आहेत.
वेबसीरिज बनवायला दुप्पट वेळ लागला
संजय लीला भन्साळी म्हणाले की, चित्रपटांच्या तुलनेत वेब सीरिज बनवायला दुप्पट वेळ लागला. ते म्हणाले की, सीरिज बनवताना जर तुमचा कोणताही शॉर्ट चुकला तर तुम्हाला पुन्हा स्क्रिप्ट पाहावी लागते. ते पुढे म्हणाले की, एखादा चित्रपट बनवताना जितका वेळ लागतो त्याच्या दुप्पट वेळ वेबसीरिज बनवताना लागतो. वेबसीरिजना बनवताना तुमचं पूर्ण लक्ष आणि कायम सतर्क असणं गरजेचं आहे. मी माझा परीने सीरिजला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.'
अनेक मोठ्या अभिनेत्रींचा वेबसीरिजमध्ये सहभाग
हिरामंडीची कथा भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर आधारित आहे. या सीरिजमध्ये प्रेम, विश्वासघात आणि राजकारण हे बरंच काही पाहायला मिळणार आहे. या वेब सीरिजमध्ये मनिषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख या अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :