CM Eknath Shinde Ayodhyavisit : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगने दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde ) एक मास्टरप्लॅन करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे पुढच्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या अयोध्या दौऱ्यात सर्व मंत्री आणि आमदार सहभागी होणार आहेत. एकनाथ शिंदे यांना अयोध्येतील महंत धनुष्यबाण भेट देणार आहेत. हे धनुष्यबाण शिंदे गटाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरवलं जाणार आहे.
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आता आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा आयोध्या दौरा पुढच्याच आठवड्यात नियोजित केला असल्याची माहिती मिळाली आहे. आयोध्या दौऱ्यावरून आल्यानंतर तेथील महंतांनी दिलेला धनुष्यबाण राज्यभर फिरवले जाणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. शुक्रवारी निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील एखनाथ शिंदे यांना मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.
महत्वाच्या बातम्या