Ashok Saraf Birthday : मराठी मनोरंजन विश्वातील बहारदार व्यक्तिमत्व म्हणजे चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf). आपल्या दमदार अभिनयाने गेली अनेक वर्ष रसिकांचं त्यांनी भरपूर मनोरंजन केलं. वाढतं वय त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आड कधीही आलं नाही. शनिवार, म्हणजेच आज (4 जून) अशोक सराफ आपला अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून झी टॉकीजने अशोक सराफ यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा नजराणा झी टॉकीजच्या प्रेक्षकांसाठी आणला आहे.
शनिवार 4 जूनला सकाळी 10.30 वाजता ‘आलटून पालटून’, दुपारी 1 वाजता ‘धूमधडाका’, दुपारी 4.30वाजता ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, सायंकाळी 7 वाजता ‘बिनकामाचा नवरा’, रात्री 9.30 वाजता ‘शंभर नंबरी सराफ’ या अशोक सराफ यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या मेजवानीचा आस्वाद झी टॉकीजच्या प्रेक्षकांना संपूर्ण दिवसभर घेता येणार आहे.
पाच दशकांपासून करतायत प्रेक्षकांचे मनोरंजन
आपल्या विनोदी पण दमदार अशा अभिनयाने, अशोक सराफ यांनी तब्बल पाच दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त झी टॉकीजने चित्रपटरूपी शुभेच्छांनी त्यांच्या कारकिर्दीला व भावी आयुष्यासाठी हा मानाचा मुजरा केला आहे.
अशोक सराफ यांनी 1969मध्ये ‘जानकी’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर अशोक सराफ यांनी 1971मध्ये आलेल्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, 1975मध्ये आलेल्या दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' या आयकॉनिक चित्रपटाने त्यांना मोठे यश मिळाले. यानंतर, अशोक सराफ यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अनेक मराठी चित्रपटांमध्ये ते कॉमेडी करताना दिसले. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
हेही वाचा :
- Entertainment News Live Updates 4 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- S. P. Balasubrahmanyam Birth Anniversary : ‘दक्षिणेतील रफी’ अशी ओळख, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही कोरले नाव! वाचा एस. पी. बालासुब्रमण्यमबद्दल...
- Samrat Prithviraj : 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन