Aruna Irani Birthday : बॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण निर्माण करणाऱ्या अभिनेत्री अरूणा ईराणी (Aruna Irani) यांचा आज 75 वा वाढदिवस. 80-90 दशकातील अनेक हिट चित्रपटांमध्ये अरूणा यांनी प्रमुख भूमिका साकारली. चित्रपटांबरोबरच छोट्या पडद्यावरील मालिकांमधून देखील अरूणा या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. 'औलाद', 'हमजोली', 'नया जमाना' यांसारख्या चित्रपटांमध्ये कॉमेडिग किंग महमूद (Mehmood) यांच्यासोबत अरूणा यांनी काम केले. तसेच 'बेटा' या चित्रपटामधील अरूणा यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. एका मुलाखतीमध्ये अरूणा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं होतं.
अरूणा यांनी 1990 मध्ये दिग्दर्शक कुक्कू कोहली यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यावेळी अरूणा यांच वय हे 40 वर्ष होतं. या प्रेमकहाणीची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, चित्रपटाच्या सेटवर मी नेहमी वेळेत यायचे. मात्र, कुक्कू कलाकारांना नेहमीच थांबवून ठेवायचे. यामुळे माझे आणि त्यांचे वाद व्हायचे. यानंतर मी रागावले की, ते माझी समजूत काढायचे. या दरम्यान आम्ही प्रेमात कधी पडलो, ते कळलंच नाही.
अरूणा यांच्यासोबत लग्न करण्याआधी कुक्कू यांचे आधी एक लग्न झाले होते. ही गोष्ट अरूणा यांना माहित नव्हती, असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. पण त्यानंतर काही वर्षानं कुकू यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले.
अरूणा यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यांनी बॉलिवूडबरोबरच कन्नड, मराठी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये देखील अरूणा यांनी काम केले.
संबंधित बातम्या