Arijit Singh Birthday : मनोरंजन विश्वात असे अनेक आवाज आहेत, जे प्रेक्षकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात घर करून राहिले आहेत. याच आवाजांपैकी एका आहे गायक अरिजित सिंह (Arijit Singh). आपल्या आवाजातून प्रेम आणि दुःख या दोन्ही भावना तितक्याच प्रभावीपणे व्यक्त करून तो संगीत जगतात लोकप्रिय ठरला. आपल्या गाण्यातून त्याने लोकांच्या मनावर राज्य केले आहे. आज (25 एप्रिल) अरिजित आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे.


अरिजित सिंहचा जन्म 25 एप्रिल 1987 रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झाला. त्यांचे वडील पंजाबी आणि आई बंगाली होती. अरिजितला संगीताचा वारसा त्याच्या कुटुंबाकडून मिळाला आहे. त्याची आई गायिका होती, तर मामा तबलावादक होते. त्याच्या आजींलाही भारतीय सांस्कृतिक संगीतात रस होता. यानंतर अरिजितने ठरवलं होतं की, आपणही संगीतातच करिअर करायचं.


संगीत क्षेत्रात करावा लागला संघर्ष!


अरिजित सिंहने 2005मध्ये 'फेम गुरुकुल' या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. मात्र, तो हा शो जिंकू शकला नाही. मात्र, रिअॅलिटी शोमधून अरिजितने श्रोत्यांवर अशी जादू पसरवली की, त्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीही त्याला खुणावू लागली. अरिजितने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटासाठी एक गाणे गायले होते. मात्र, हे गाणे ऐनवेळी चित्रपटातून वगळण्यात आले होते.


‘मर्डर 2’च्या ‘फिर मोहब्बत’ या गाण्यातून अरिजित सिंहने बॉलिवूडविश्वात पदार्पण केले. यानंतर त्यांना ‘आशिकी 2’ या चित्रपटात गाणी गाण्य्ची संधी मिळाली. या चित्रपटाने त्याचं नशीब रातोरात बदललं. यानंतर त्याने अनेक गाणी गायली, जी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. 'फिर भी तुमको चाहूंगा', 'पछताओगे', 'पल', 'खैरियत', 'सोच ना सके', 'इलाही', 'हमारी अधुरी कहानी' या त्याच्या गाण्यांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं.


हेही वाचा :