Sumona Chakravarti : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन सुमोना चक्रवर्तीला (Sumona Chakravarti)  द कपिल शर्मा शोमुळे (The Kapil Sharma Show) विशेष लोकप्रियता मिळाली. आता सुमोना ही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ती अभिनेता सम्राट मुखर्जीसोबत (Samrat Mukerji) लग्नगाठ बांधणार आहे, असंही म्हटलं जात आहे. सम्राट हा  काजोल (Kajol), तनीषा (तनीषा ) आणि अयान मुखर्जीचा (Ayan Mukerji) चुलत भाऊ आहे.


एका मुलाखतीमध्ये सुमोनाला लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुमोनानं उत्तर दिलं, 'दहा वर्षांपासून या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. पण हे सगळं खोटं आहे. याबाबत मला काहीही बोलायचे नाही. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही. जर काही ठरलं तर मी स्वत: ते तुम्हाला सांगेल. ' 


सम्राटसोबतच्या नात्याबाबत सुमोना म्हणाली, 'तो माझा मित्र आहे. त्यापेक्षा जास्त काहीही नाही.' सम्राट मुखर्जीनं 1996 मध्ये रिलीज झालेल्या 'राम और श्याम' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तसेच त्यानं अनेक बंगाली भाषेमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2005 मध्ये रिलीज झालेल्या  'द ब्लू अम्ब्रेला' या चित्रपटामध्ये सम्राटनं बिज्जू ही भूमिका साकारली. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केलं. तसेच आशुतोष गोवारिकर यांच्या  'खेलें हम जी जान से'  या चित्रपटामध्ये देखील त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली. हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झाला होता. तर सुमोना ही द कपिल शर्मा शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.  23 एप्रिल  2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. रिपोर्टनुसार, सुमोना ही 'द कपिल शर्मा शो' च्या एका एपिसोडचे सहा ते सात लाख रूपये मानधन घेत होती. सुमोनानं या शोमध्ये अनेक भूमिका साकारल्या पण तिच्या भूरी या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  


संबंधित बातम्या