Ricky Kej :  लास वेगास येथील MGM ग्रँड अरेना येथे 64व्या ग्रॅमी पुरस्कारांचे (Grammy Awards 2022) आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी हा कार्यक्रम लॉस एंजेलिसमध्ये होणार होता, परंतु कोरोना महामारीमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. संगीतविश्वातील हा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. संगीतविश्वात काम करणाऱ्या कलाकारांना या पुरस्कारादरम्यान विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात. यावेळी सुमारे 28 श्रेणींमध्ये ग्रॅमीमध्ये हा पुरस्कार दिला गेला आहे. पुरस्कारांची यादीही जाहीर झाली आहे.


भारतीय गायक रिकी केजला (Ricky Kej) ‘सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम’ या श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी पुन्हा एकदा देशाचे नाव या जगात रोशन केले आहे. रिकीने ग्रॅमी पुरस्कार जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.



ऑलिव्हिया रॉड्रिगोने ‘बेस्ट न्यू आर्टीस्ट’चा पुरस्कार जिंकला, तर ‘लीव्ह द डोर ​​ओपन’ने ‘साँग ऑफ द इयर’चा पुरस्कार जिंकला. अँडरसन पाक आणि ब्रुनो मार्स यांनी हे गाणे तयार केले आहे. फू फायटर्सला ‘सर्वोत्कृष्ट रॉक अल्बम’चा पुरस्कार मिळाला. याशिवाय फू फायटर्सने सर्वोत्कृष्ट ‘रॉक साँग’ आणि ‘सर्वोत्कृष्ट रॉक परफॉर्मन्स’चा पुरस्कारही जिंकला आहे.


रिकी केजने ग्रॅमी अवॉर्ड मिळाल्यावर ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. फोटो शेअर करताना, त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘आज आमच्या अल्बम डिव्हाईन टाइड्ससाठी ग्रॅमी अवॉर्ड जिंकला, माझ्यासोबत उभा असलेला हा दिग्गज @copelandmusic. माझा दुसरा ग्रॅमी आणि स्टीवर्टचा सहावा आहे, याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. ज्यांनी माझे संगीत सहयोग केले, माझे काम ऐकले त्या प्रत्येकाचे आभार.’ प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान देखील ग्रॅमी अवॉर्डचा भाग होण्यासाठी लास वेगासमधील एमजीएफ ग्रँड एरिना येथे पोहोचले होते. एआर रहमान यांचे या ठिकाणी बसलेले फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha