मुंबई: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. सामनाच्या आजच्या अग्रलेखात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन करण्यात आला आहे. मात्र, हे अभिनंदन करताना शिंदे सेनेला आजच्या आग्रलेखात टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. राज्यात तीन वर्षांपूर्वी शिंदेचे सरकार आले आणि राज्यात फिक्सर व दलालांचे पीक आले. हे भ्रष्टाचाराचे पीक कापण्याचा काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्याने त्यांचा अभिनंदन सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. पण, हे काम मुख्यमंत्र्यांना सोपं नसल्याचा सुद्धा आग्रलेखात नमूद करण्यात आला आहे. या सामना अग्रलेखातून विरोधक म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेने थेट शिंदेंना आणि त्यांच्या मंत्र्यांना नेत्यांना टार्गेट केलं असून देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे.
यामधून आपला महायुती सरकारमधील पहिल्या क्रमांकाचा विरोधक शिंदेंची शिवसेना असल्याचं दिसून येतं आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करून शिंदे सेनेला एक प्रकारे अस्थिर करण्याचा एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न सुद्धा या अग्रलेखातून केल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक, अभिनंदन आणि भेटीगाठी झाल्यात जाणून घ्या.
मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांचे कौतुक, अभिनंदन आणि भेटीगाठी
3 जानेवारीला - गडचिरोली दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आणि तिथे विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केल्यानंतर "अभिनंदन, देवाभाऊ" मधल्या खाली सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला होता.
17 डिसेंबर- नागपूर अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस भेट - मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांसह देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन करण्यासाठी नागपूर विधान भवनात भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे भास्कर जाधव इतर आठ ते नऊ आमदार उपस्थित होते.
20 डिसेंबर - नागपूर अधिवेशनादरम्यान - आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीस भेट - संजय राऊत यांच्या घराची रेकी केल्यानंतर या सगळ्या संबंधित तपास करण्यासंदर्भात भेट घेतली.
9 जानेवारी - आदित्य ठाकरे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट मुंबईतील प्रश्नांसंदर्भात भेट घेतली होती.
20 फेब्रुवारी - सिडको प्रोजेक्ट मध्ये भ्रष्टाचार फडणवीस चौकशी करणार - देवेंद्र फडणवीस चौकशी समिती स्थापन करत असतील तर त्याच संजय राऊत यांच्याकडून स्वागत केलं गेलं.
26 फेब्रुवारी - सामना अग्रलेख - फिक्सरांचा सिक्सर - सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. फिक्सर आणि दलाल यांचा राज्यात आलेलं पीक कापण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी ठरवल्याने त्यांचा अभिनंदन केलं आहे.