Govinda Sunita Ahuja Divorce Rumors: बॉलिवूड सुपरस्टार (Bollywood Superstar) गोविंदा (Govinda) आणि पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) यांच्या घटस्फोटाची (Divorce Rumors) बातमी वाऱ्यासारखी पसरली. चोहीकडे दोघांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. सुनीता अहुजाचे काही जुने व्हिडीओ देखील व्हायरल केले जात आहेत. अशातच आता दोघांचा 37 वर्षांचा संसार तुटणार असून दोघांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे. 


दरम्यान, या अफवांवर, अभिनेत्याच्या वकिलानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनी सांगितलं की, त्यांचं नातं मजबूत आहे. तसेच, सहा महिन्यांपूर्वी सुनीता अहुजानं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचंही उघड झालं आहे. पण, त्यानंतर सगळं सुरळीत झालं आणि हे जोडपं पुन्हा एकत्र आलं आहे.


अ‍ॅडव्होकेट ललित बिंदल यांनी इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं की, "आम्ही सर्वजण नव्या वर्षाच्या निमित्तानं नेपाळला गेलो होतो. तिथे दोघांनीही पशुपतिनाथ मंदिरात एकत्र पूजा केली. आता त्यांच्यात सर्व काही ठीक आहे. आणि तरीही, जोडप्यांमध्ये अशा गोष्टी घडतच राहतात. पण त्यांचं नातं मजबूत आहे आणि दोघेही नेहमी एकत्र राहतील."


"एकत्रच राहतात गोविंदा आणि सुनीता"


गोविंदाचे वकील ललित बिंदल यांनी सुनीता आणि गोविंदा वेगळे राहत असल्याचं नाकारलं. त्यांनी सांगितलं की, खासदार झाल्यानंतर, गोविंदानं त्याच्या ऑफिशियल कामांसाठी हा बंगला खरेदी केला होता, जो सुनीता आणि गोविंदा त्यांच्या लग्नापासून ज्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये राहतात, त्याच्या अगदी समोर आहे. वकिलानं सांगितलं की, गोविंदा कधीकधी मिटिंग्जना जातो आणि त्यामुळे तो कधीकधी बंगल्यातच झोपतो. पण याचा अर्थ दोघे वेगळे राहतात असं नाही, हे जोडपं एकत्रच राहातं.


"सुनीता आहुजा आणि गोविंदा घटस्फोट घेणार नाहीत"


वकिलानं सांगितलं की, सुनीता आहुजा यांनी पॉडकास्टमध्ये किंवा सार्वजनिकरित्या जे काही सांगितलं आहे, ते फार काटून-छाटून व्हायरल केलं जात आहे. घटस्फोटाच्या अफवा पसरवण्यासाठी या सर्व गोष्टी व्हायरल केल्या जात आहेत. ते म्हणाले की, ज्यावेळी सुनीता अहुजा म्हणाल्यात की, मला गोविंदासारखा नवरा नकोय. त्याचवेळी त्या हेदेखील म्हणाल्या होत्या की, मला अभिनेत्यासारखा मुलगा हवाय. ज्यावेळी त्या म्हणाल्या की, गोविंदा त्यांच्या व्हॅलेंटाईनसोबत आहे, त्याचा अर्थ असा होता की, अभिनेता काम करत आहे. बरं त्याचवेळी त्यांनी हे लगेच स्पष्टसुद्धा केलं होतं.  सध्या लोक त्या दोघांबद्दल फक्त नकारात्मक बोलतायत, हे फार वाईट आहे, तेसुद्धा दोघेही एकत्र असताना. मी गॅरेंटी देतो की, ते दोघेही कायम एकत्रच राहतील. त्यांचा काही घटस्फोट वैगरे होणार नाही.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Govinda Divorce Rumors: गोविंदा 30 वर्षांच्या मराठी अभिनेत्रीला करतोय डेट?; काही वर्षांपूर्वी म्हणाला होता, माझ्या कुंडलीत...