Govinda manager denies divorce rumours : अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा विवाह होऊन तब्बल 38 वर्षं झाली आहेत. पण पुन्हा एकदा त्यांच्या नात्यात मतभेद आणि तणाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत. रिपोर्ट्नुसार, सुनीता आहूजाने पती गोविंदापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असून तिने मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात अर्जही दाखल केला आहे. याशिवाय सुनीता आहुजाने गोविंदावर गंभीर आरोप केल्याचं देखील बोललं जात आहे. मात्र गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी या घटस्फोटाच्या बातम्या खोट्या आणि निराधार असल्याचं सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की गोविंदा आणि सुनीता यांचा घटस्फोट होणार नाही.
गोविंदाचे मॅनेजर शशी यांनी काय सांगितलं?
Hindustan Times शी बोलताना शशी म्हणाले, “प्रत्येक जोडप्यात थोडेफार मतभेद असतातच. ही सगळी जुनी प्रकरणं आहेत. पण काही लोक त्याला मिरची-मसाला लावून स्वतःच्या फायद्यासाठी वापरायचा प्रयत्न करत आहेत.”
मीडिया रिपोर्ट्नुसार, सुनीताने गोविंदावर अफेअर, अत्याचार आणि त्यांना एकटं सोडून देण्याचे आरोप केले आहेत. याबद्दल विचारले असता शशि म्हणाले, “गोविंदा कधी कोणावर हात उगारू शकत नाही, ओरडू शकत नाही, मग अत्याचाराचा प्रश्नच येत नाही. मी त्यांच्यासोबत खूप जवळून काम केलं आहे. त्यांची सध्याची जी इमेज दाखवली जाते आहे, तसे ते मुळीच नाहीत. ही सगळी जुनी प्रकरणं आहेत. ते वाद मिटवण्यासाठी दोघं नवरा-बायको मिळून काम करत आहेत.”
शशी पुढे म्हणाले, “गोविंदा कोर्टात हजर झाले नाहीत, पण सुनीताही कोर्टात गेली नाही, फक्त एकदाच केस दाखल करण्यासाठी गेल्या होत्या. प्रत्येक जोडप्यात काही समस्या असतातच. सुनीता गोविंदावर खूप प्रेम करतात आणि दोघं एकत्र आहेत. घटस्फोट होणार नाही. ते नकारात्मक गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या मुलांच्या करिअरवर आणि लग्नावर लक्ष केंद्रित करत आहेत.”
गोविंदाची इमेज खराब करण्याचा प्रयत्न?
शशी पुढे बोलताना म्हणाले, “मोठमोठे आरोप करून, लहान गोष्टींना फार मोठं करून दाखवून तुम्ही फक्त एक नातं बिघडवत आहात. व्ह्यूजच्या मागे लागून एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणार का? इतक्या वर्षांत कोणी गोविंदाला सुनीताबद्दल काही वाईट बोलताना ऐकलंय का? उलट सुनीताने कधीकधी काही मुलाखतींमध्ये गोविंदाविरुद्ध थोडंसं बोललं असेल. येणाऱ्या गणेश चतुर्थीला तुम्हाला ते दोघं एकत्र दिसतील. तुम्ही त्यांच्या घरी या.”
घटस्फोटाच्या अफवा केव्हापासून सुरु झाल्या?
फेब्रुवारी 2025 मध्ये गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या बातम्या पहिल्यांदा समोर आल्या. वेगवेगळ्या जीवनशैली आणि सततच्या भांडणांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात होतं. तसेच, गोविंदाची एका 30 वर्षांच्या अभिनेत्रीशी जवळीक वाढल्यामुळे सुनीता आणि त्याच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या चर्चा होत्या.
मात्र गोविंदाचे वकील म्हणाले होते की, संबंधित जोडप्याने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, पण नंतर त्यांच्या नात्यात सुधारणा झाली. सुनीताने मात्र कायम घटस्फोटाच्या बातम्या चुकीच्या असल्याचं सांगितलं आहे. तिचं म्हणणं आहे की ती गोविंदावर खूप प्रेम करते आणि काही लोक जाणूनबुजून त्यांचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या