Actress Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट (Actress Priya Bapat) हिने मराठी सिनेसृष्टीत बरोबरच हिंदी सिनेमात देखील स्वत:चं एक वेगळ स्थान निर्माण केलं. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्रिया बापट (Actress Priya Bapat) सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी काहीना काही शेअर करत असते. सध्या प्रिया बापटच्या (Actress Priya Bapat) आगामी ‘बिना लग्नाची गोष्ट’ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. 12 सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, सध्या तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झालाय. तिने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला छेडछाडीचा प्रकार सांगितला होता. तिच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झालाय.  

Continues below advertisement


अभिनेत्री प्रिया बापटने काही दिवसांपूर्वी ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत स्वतःसोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग उघडपणे सांगितला होता. यावेळी बोलताना प्रिया बापट म्हणाली, “हा प्रकार 2010 मध्ये दादरमध्ये घडला होता. मी शूटिंगवरून घरी परतत होते आणि फोनवर मैत्रिणीशी बोलत चालले होते. एका हातात सामान आणि कानाला फोन लावून मी घरी जात असतानाच अचानक एक माणूस माझ्यासमोर आला. त्याने माझ्या स्तनांना स्पर्श केला आणि क्षणात तिथून निघून गेला. इतकं सगळं पटकन घडलं की मला काय घडतंय हे समजण्याआधीच तो नाहीसा झाला. मी स्तब्ध उभी राहिले आणि मागे वळून पाहिलं, तेव्हा तो माणूस गायब झाला होता. एका क्षणभरात एवढा मोठा प्रकार घडला होता.”






पुढे बोलताना प्रिया बापट म्हणाली, “मी खूप घाबरले आणि रडतच घरी पोहोचले. तेव्हा आई घरी नव्हती. बाबांनी विचारल्यावर मी सगळं सांगितलं. त्यांनाही फार वाईट वाटलं, पण त्या क्षणी काहीच करता येत नव्हतं. मात्र त्याच दिवसापासून मी ठरवलं की, कोणी माझ्याशी चुकीचं वागलं किंवा वाईट नजरेने पाहिलं, तर त्याला गप्प बसून सोडायचं नाही. तो राग आजही माझ्या मनात तसाच आहे.”


सध्या प्रिया तिच्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तिच्या वेगळ्या भूमिकांमुळे ती प्रेक्षकांच्या लक्षात राहते. याचदरम्यान, प्रिया आणि उमेश कामतचा ‘बिना लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट 12 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


जंगलाचा राजा कोण होणार? हार्दिक जोशीच्या 'अरण्य' सिनेमाचा टीझर रिलीज, नव्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला


हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, तटकरेंच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न