Genelia Angry On Riteish Deshmukh: महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणजे, रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडच्या मोस्ट फेवरेट कपल्समध्येही दोघांची गणना होते. रितेश-जिनेलिया म्हणजे, पॉवर कपल असंही म्हटलं जातं. पण, सध्या लाडके दादा-वहिनी चर्चेत आले आहेत. याचं कारण आहे, आयफा अवॉर्ड्स 2019 मधला तो व्हिडीओ. या व्हिडीओवरुन बराच काळ, अगदी आजही चर्चा रंगतात. याच सातत्यानं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर आता स्वतः जिनेलिया देशमुखनं स्पष्टीकरण दिलं आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बऱ्याच गोष्टींचे वेगवेगळे अंदाज लावले जातात. कधी त्याच्या हसण्याचा वेगळा अर्थ लावला जातो, तर कधी एखाद्या हावभावाचा वेगळा अर्थ लावला जातो. अनेक फक्त अर्थ लावण्यापुरतं प्रकरण मर्यादित राहत नाही, तर या गोष्टीच्या अफवा पसरतात. कधीकधी तर अफवा, चर्चा अगदी कळस गाठतात. असंच काहीसं रितेश आणि जिनेलियाच्याबाबतीत आयफा अवॉर्ड्स 2019 मध्ये घडलं. अभिनेत्री जिनेलिया देशमुख ही पती रितेश देशमुखबाबत एका प्रसंगावरुन अस्वस्थ असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि चाहत्यांनी लगेचच अंदाज बांधायला सुरुवात केली.
खरं तर, हा व्हिडीओ होता रितेश देशमुख आणि अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्यातील संभाषणाचा. दोघांमधील संभाषणावेळी जिनेलिया काहीशी अस्वस्थ झालेली दिसली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. अशातच आता जिनेलिया देशमुखनं स्पष्ट समोर येत सर्व गोष्टींवर स्पष्टीकरण दिलं आहे. अरबाज खानच्या 'पिंच' या चॅट शोमध्ये बोलताना ती म्हणाली की, "मी बऱ्याच दिवसांना एखाद्या अवॉर्ड फंक्शनला उपस्थित होते. त्यामुळे सुंदर ड्रेस आणि हाय हिल्स घालून तयार झालेले. पण, त्यावेळी अनेकजण भेटत होते, गप्पा मारत होते. अशातच काही वेळातच माझे पाय दुखायला लागले. तर, त्याचवेळी रितेश आणि प्रिती झिंटा दुसरीकडे बोलत होते. माझे पाय दुखत असल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन आले, नेमके तेच दुर्दैवानं त्यावेळी कॅमेऱ्यानं टिपले." पुढे बोलताना जिनेलियानं यासंदर्भात गमतीशीर भाष्यही केलं आहे. गेल्याचवर्षी जिनेलियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याला "Wanna know what happened back home?", असं मजेशीर कॅप्शन दिलं होतं.
लग्नानंतर जिनेलिया सिनेसृष्टीपासून दूर
बॉलिवूड अभिनेत्री जिनेलिया डिसोझानं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखसोबत आपली लग्नगाठ बांधली. लग्नानंतर मात्र जिनेलिया सिनेसृष्टीपासून दुरावली गेली. तिनं काही प्रोजेक्ट्स केले, मात्र ती मोठ्या पडद्यावर दिसलीच नाही. अनेकांनी तिला विचारलं की, "तू आता काम का करत नाहीस...?" यावरही जिनेलियानं नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना म्हटलं की, "लोक काय बोलतात याला मी फारसं महत्त्व देत नाही. मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवण्यात आनंद मिळतो. मी ठरवलं होतं की, माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आणि मला अजूनही ते आवडतं."
दरम्यान, जिनेलिया आणि रितेश हे पॉवर कपल महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ओळखले जातात. दोघांनाही दोन मुलं आहेत. अनेकदा दोघे अवॉर्ड फंक्शनला एकत्र दिसून येतात. तसेच, अनेकदा पॅपाराझींच्या कॅमेऱ्यातही कैद होत असतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :