Actress Casting Couch Experience :  बॉलिवुडनंतर आता मल्याळम इंडस्ट्रीमध्येही 'मी टू' या चळवळीने सुरुवात केली. मल्याळम सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगांविषयी भाष्य केलं. त्यातच आता आणखी एका अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील कास्टिंग काऊचचा अनुभव संगितला आहे. तिचा हा धक्कादायक अनुभव ऐकून साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री गेहना विशिष्ठने (Gehana Vasisth) तिचा हा अनुभव सांगितला आहे. 


गेहना वशिष्ठने नुकतीच दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत. यावेळी अभिनेत्रीने सांगितलेल्या अनुभवावर कुणालाच विश्वास ठेवता येणार नाही. गेहनाने तिच्या आयुष्याच्या प्रवासाविषयीही यावेळी सांगितलं आहे. 


गेहनाने काय म्हटलं?


गेहनाने तिचा धक्कादायक अनुभव सांगताना म्हटलं की, मी छत्तीसगडमधील एका छोट्या गावतून आले आहे. मी अभ्यासातही खूप हुशार होते. पण माझं लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचं स्वप्न होतं. त्यामुळे मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला यावं लागलं. सुरुवातीला मला फक्त एक-दोन प्रोडक्शन हाऊसच माहिती होती. यामध्ये बालाजी प्रोडक्शनबद्दल खूप ऐकलं होतं. जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा मला बालाजी टेलिफिल्म्सचा दिग्दर्शक म्हणून ओळख एक व्यक्ती भेटली आणि मला काम देण्याचं त्याने आश्वासनही दिलं. 


पुढे तिने म्हटलं की, 'त्या व्यक्तीचं नाव प्रवीण जोहान असं होतं. तो बालाजी टेलिफिल्म्समध्ये दिग्दर्शक असल्याचे त्याने सांगितले आणि त्याच्या बोलण्याला मी मनावर गेतलं होतं. यानंतर त्या व्यक्तीने मला घरी बोलावलं. तिथे त्याने मला एका सीनसाठी डेमो द्यायला सांगितलं. तो म्हणाला की, चित्रपटात एक सीन आहे जिथे तुला दारु प्यावी लागते. त्यामुळे मला आधी डेमो दाखव. त्याने मला खूप दारु प्यायला लावली. त्यानंतर मी पूर्ण नशेत होते. याचाच फायदा घेऊन त्याने माझ्यावर बलात्कार केला.'


याचसोबत गेहनाने अनेक निर्माते आणि म्युझिक कंपन्यांवरही आरोप केले आहेत. इतकी वर्ष तिचं इंडस्ट्रीमध्ये शोषण होत असल्याचं गेहनाने सांगितलं आहे. पण तिला इंडस्ट्रीतून काढून टाकतील या भीतीने गप्प राहिली होती, असंही तिने यावेळी म्हटलं. दरम्यान गेहनाच्या या धक्कादायक अनुभवानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 


ही बातमी वाचा : 


Vaibhav Chavan : अरबाजची सावली दुरावली, वैभव चव्हाण घराबाहेर; या आठवड्यात दोन स्पर्धकांचा खेळ संपला