Gautami Patil: नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.  गौतमीचा डान्स आणि तिच्या अदा  प्रेक्षकांना घायाळ करतात. गौतमी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये गौतमी पाटीलनं मराठा आरक्षण, आगामी चित्रपट आणि हिंदवी पाटील अशा विविध विषयांवर चर्चा केली. "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मला देखील आरक्षण हवंय" असंही तिनं यावेळी सांगितलं. 


मराठा आरक्षणाबद्दल काय म्हणाली गौतमी? (Gautami Patil On Maratha Reservation)



मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर गौतमी पाटील म्हणाली, "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. साहजिक आहे आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळेलच पाहिजे. मला देखील आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय". पुढे गौतमी म्हणाली, "कोरोना काळात माझी ही परिस्थिती खूप हालाखीची होती. हे क्षेत्र चालायला हवं. सध्या सगळं नीट सुरू आहे."


आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात नाही म्हणत: गौतमी पाटील


गौतमी पाटीलसोबतच आता हिंदवी पाटीलची देखील लोकप्रियता वाढत आहे. याबद्दल गौतमीनं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, "मी अकरा वर्षापासून या क्षेत्रात काम करते. अनेक मुली माझ्या हाताखालून गेल्या आहेत. हिंदवी पाटीलचं देखील चांगलं होवो.आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात नाही म्हणत. उलट त्यांचं चांगलं होऊ दे, असं आम्ही म्हणतो."


राजकारण एन्ट्री करणार का? गौतमी म्हणते...


गौतमी पाटील राजकारण एन्ट्री करणार का? असा प्रश्न जेव्हा गौतमीला विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, "मी अजिबात राजकारणात जाणार नाही."


गौतमी पाटीलचा घुंगरु हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता चित्रपटांमध्ये काम करताना गौतमी नृत्यक्षेत्र सोडणार का? असा देखील प्रश्न अनेकांना पडला होता. याबद्दल गौतमी म्हणाली,  'नवा चित्रपट मिळाला तर करेन पण मी चित्रपट मिळाला तरी डान्स करणे सोडणार नाही'.


लग्नाबाबत देखील अनेकवेळा गौतमीला प्रश्न विचारला जातो. पुण्यातील पत्राकार परिषदेमध्ये गौतमीनं तिच्या लग्नाबाबत सांगितलं, "सध्या माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही" 


कधी रिलीज होणार घुंगरु ?


गौतमीचा घुंगरु या चित्रपटामधील अभिनय बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत.'घुंगरू' या चित्रपटात गौतमी पाटीलसोबत बाबा गायकवाड देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 15 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Gautami Patil: "माझा कारभार सोपा नसतोय रं" नंतर आता "दिलाचं पाखरू "; गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची होतीये चर्चा!