छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) जे काही बोलले ते बरोबर आहे. कारण ते खोटं बोलत नाही. मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विनंती करतो, त्यांनीही खोटं बोलू नये. कारण आंतरवाली सराटीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांचे देखील मंत्री आले होते. त्यावेळी, फडणवीस यांनी सांगितले होते की, आंतरवाली सराटीतील तुमच्या कार्यकर्त्यावरील गुन्हे मागे घेऊ. सोबतच, महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेऊ. त्यामुळे, यापासून फडणवीसांनी मागे फिरू नये. त्यांनी खरं बोलावं, त्या एकट्याचं (छगन भुजबळ) ऐकून आमच्यावर अन्याय करू नये. नसता मराठ्यांना नाविलाजाने आंदोलन करावे लागेल, असे मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहे. 


ज्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारे बाधा येऊ नये असं, राज्य मागासवर्ग आयोगाने करावं. त्यावर राज्य मागासवर्ग आयोगाने लक्ष द्यावे. या अगोदरच्या आयोगावर वेगवेगळे जातीचे वेगवेगळे लोकं होते. त्यावर आम्ही कधी प्रश्न उपस्थित केले का?, समितीचा अध्यक्ष ओबीसी असला तर ओबीसीचा आयोग असतो असं असतं का?, ते गरीब जनतेला न्याय देण्यासाठी कायद्याने बसवलेला आहे. ते न्यायाची प्रक्रिया पार पाडत असतात, त्यांना जात नसते, असे मनोज जरांगे म्हणाले. मात्र, आयोगाचे अध्यक्ष ओबीसी असल्यास तुम्हाला गोड लागतं. या आयोगावर आता कोण आलं हे मला माहीत नाही, पण आयोगात जाती का आणल्या जात आहे हे मला कळत नाही, असेही जरांगे म्हणाले. 


मागासवर्ग आयोगाच्या राजीनामा सत्रवर प्रतिक्रिया...


आयोगात जात पाहणे हे सर्व खालच्या दर्जाचे विचार आहेत. कशातही जात बघतात, हा रोग चांगला नाही. यांनी आता न्यायाधीशांची जात बघू नये. या अगोदर महापुरुषांची बघितली. न्यायमंदिरावरही यांनी भविष्यात जातीवर संशय घेऊ नये. हा माणूस देशाला, राज्याला कलंक आहे. सर्वसामान्य लोक एकमेकांच्या सुखदुखात जातात, एवढे लोकांमध्ये प्रेम आहे. मात्र, याच्यामुळे लोकांमध्ये वातावरण खराब होत आहे. यांची अशी इच्छा आहे का? लोकांनी एकमेकांना मदत करू नये. धनगर बांधव, मराठा बांधव एकमेकांच्या अडचणीत उभे राहतात, मात्र त्यांच्यात नाराजी पसरवण्याचे काम सुरू असल्याचं म्हणते जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. 


भुजबळांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे...


मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्याचे (छगन भुजबळ) ऐकून आमच्या समाजावर अन्याय करू नका. कारण आमच्या नोंदी शासकीय आणि अधिकृत सापडल्या आहेत. त्यामुळे, अन्याय करू नये. बाकी कोणत्या ओबीसी नेत्यांना आम्ही नाव ठेवणार नाही. कारण त्यांचे आणि आमचे गाव पातळीवर चांगले संबंध आहे. हा एकच आहे जो बोलत आहे. यांना जातीय तेढ निर्माण करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे नेते आंतरवालीत आले होते. त्यांचे ऐकून आम्ही मान ठेवला, त्यामुळे आता त्यांनी आमचाही मान ठेवावा, असे जरांगे म्हणाले. 


नितेश राणे यांच्यावर दबाव असेल...


नितेश राणे यांच्याकडून जरांगे यांच्यावर होत असलेल्या आरोपावर देखील जरांगे यांनी उत्तर दिले आहे. "उपोषण सुटले त्यावेळेसच गाव बंदी उठवलेली आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर न बोललेलं बरं,  त्यांना अगोदरच दोन-तीन वेळेस सांगितलेला आहे. समाजासाठी तुमचं काम मोठ आहे. पण, समाजापेक्षा पक्ष मोठा मानायचा म्हणल्यावर त्यांना असं बोलावंच लागणार आहे. शेवटी त्यांच्यावर दबाव असणार आहे. त्यामुळे ते मराठ्यांच्या विषय बोलत असतील. मात्र, आमची विनंती आहे की,  मराठ्यांच्या लेकरांच्या विरोधात त्यांनी बोलू नये. जातीपेक्षा नेते मोठे नसतात,” असे जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'हो, मनोज जरांगेंना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले'; मुख्यमंत्री शिंदेंची सभागृहात माहिती