Gaurav More :  महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi HasyaJatra) कार्यक्रमातून फिल्टरपाड्याचा गौरव मोरे (Gaurav More) हा घराघरांत पोहचला. त्याच्या कॉमेडीच्या टायमिंगने प्रेक्षकांनाही खळखळून हसवलं. इतकच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही गौरवने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता हाच गौरव हिंदीत झळकण्यासाठीही सज्ज झालाय. गौरवचा हिंदी सिनेमा नव्या वर्षात भेटीला येणार आहे. नुकतच त्याने सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. 


गौरव नव्या वर्षात संगी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात गौरव महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तसेच त्याच्यासोबत या सिनेमात शारिब हाश्मी, संजय बिष्णोई, श्यामराज पाटील, विद्या माळवदे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन  सुमित कुलकर्णी यांनी केलं आहे. येत्या 17 जानेवारी 2025 रोजी गौरवचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


गौरव झळकणार हिंदी सिनेमात


गौरवने त्याच्या सोशल मीडियावर या सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. या पोस्टवर गौरवने म्हटलं की, नवीन वर्षाची सुरुवात नव्या कामाने...आशीर्वाद असू द्या.. मैत्री हे एक असं नातं आहे जे क्षणांना आठवणींमध्ये आणि अनोळखी लोकांना कुटुंबात रुपांतरीत करतं. प्रेम, हास्य आणि मैत्रीच्या अतूट नात्याचा उत्सव असलेल्या आमच्या “संगी” चित्रपटाचं पोस्टर रिलीज करताना आनंद होतोय.                                                          


गौरवच्या 'या' शैलीचा मोठा चाहतावर्ग


गौरव मोरेने महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावलं आहे. विनोदाच्या टायमिंगची, मराठी शब्द चुकीच्या पद्धतीने उच्चारुन खुमासदार विनोद करण्याच्या गौरव या शैलीचा मोठा चाहतावर्ग आहे. गौरव मोरेला कॉलेजमध्ये असताना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्याने याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. गौरव मोरेचा 'बॉईज 4' (Boyz 4) हा सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला. तसेच त्याचा 'लंडन मिसळ' हा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 






ही बातमी वाचा : 


विजय-रश्मिका एकत्र करणार न्यू ईयरचं सेलिब्रेशन? पुष्पाची श्रीवल्ली बॉयफ्रेंडसोबत दिसली अन्...