Gashmir Mahajani On Prajakta Mali: राज्यात बीडच्या मस्साजोग प्रकरणात सरपंच संतोष देशमुख हत्येने महाराष्ट्र हादरला असून  राजकारणाला वेग आलाय. आरोप प्रत्यारोपांच्या वर्तुळात भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यानंतर मोठा गदारोळ उडाला. पत्रकार परिषद घेत अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतल्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली. दरम्यान, मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक कलाकार प्राजक्ता माळीला पाठिंबा देताना दिसले. फुलवंती चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर अभिनेता गश्मीर महाजनीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 


मला पूर्ण प्रकरण माहित नाही, कारण मी चित्रपट बनवण्यात व्यस्त आहे. पण मला इतकच माहित आहे की प्राजक्ता ही सक्षम, स्वतंत्र आणि स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेली स्त्री आहे आणि मी त्यासाठी तिचा आदर करतो. असं गश्मीर म्हणाला. Instagram वर 'आस्क मी एनीथिंग' या शीर्षकाखाली त्याला एका चाहत्याने 'प्राजक्ताच्या बाजूने काही बोलशील का?'असा प्रश्न विचारला होता. त्यावर गश्मीरने ही प्रतिक्रिया दिली आहे. 


नक्की काय म्हणाला गश्मीर महाजनी? 


गश्मीर आणि प्राजक्ताने फुलवंती या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यामध्ये निर्मिती क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल टाकलेल्या प्राजक्तासोबत शास्त्रीबुवांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता गश्मीर महाजनीने सक्षम, स्वतंत्र आणि स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेली स्त्री आहे आणि मी त्यासाठी तिचा आदर करतो. असं त्याने म्हटलं. गश्मीर शिवाय सचिन गोस्वामी, कुशल बद्रिके, विशाखा सुभेदार, सुशांत शेलार इत्यादी कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दिलाय. गश्मीर म्हणाला, मला पूर्ण प्रकरण माहित नाही, कारण मी चित्रपट बनवण्यात व्यस्त आहे. पण मला इतकच माहित आहे की प्राजक्ता ही सक्षम, स्वतंत्र आणि स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत नाव कमावलेली स्त्री आहे आणि मी त्यासाठी तिचा आदर करतो.




बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या वक्तव्याचा समाचार घेत अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांना जाहीरपणे माफीही मागावी लागली. या संपूर्ण प्रकरणात आपापसातील राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा वापर होता कामा नये असं म्हणत प्राजक्ता माळीने भूमिका स्पष्ट केली होती. तिच्या भूमिकेवर मराठी कला विश्वातील अनेक कलाकारांनी पाठिंबाही दर्शवला. यात गश्मीर महाजनीने ही प्रतिक्रिया दिली आहे. 


हेही वाचा:


Suresh Dhas Prajakta Mali: सुरेश धस यांची दिलगिरी, वादावर पडदा टाकला; अभिनेत्री प्राजक्ता माळीची भूमिका काय?