Suresh Dhas Prajakta Mali: सुरेश धस यांची दिलगिरी, वादावर पडदा टाकला; अभिनेत्री प्राजक्ता माळीची भूमिका काय?

Suresh Dhas Prajakta Mali: प्राजक्ता माळीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Continues below advertisement

Suresh Dhas Prajakta Mali: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीसंदर्भात (Prajakta Mali) केलेल्या वक्तव्यावर जाहीर दिलगिरी व्यक्त करत भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी एकप्रकारे वादावर पडदा टाकला. प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त केली, खरी पण आता प्राजक्ता माळी काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताई सह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने, त्यांचे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे सुरेश धस यांनी म्हटलं. दरम्यान, मला भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांचा फोन आला नाही, किंवा कुणी माफीसाठी दबाव टाकला नाही. केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझं बोलणं झालं, असेही सुरेश धस यांनी स्पष्ट केले. 

प्राजक्ता माळीने घेतली होती देवेंद्र फडणवीसांची भेट-

सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी चांगलीच संतापलेली पाहायला मिळाली. यासंदर्भात प्राजक्ता माळीने देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली. या भेटीमध्ये सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्ता माळीला आश्वस्त केले. 

सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा भेट घेणार-

भाजप आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आज सुरेश धस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांचा आरोप असून या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नेमणूक करण्याचीही सुरेश धस करणार आहेत. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातमी:

मारहाणीचे चार व्हिडीओ हाती, राजकीय नेत्यांना कॉल; संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola