Gajraj Rao social media post About Katrina Kaif, Vicky Kaushal Wedding : 'बधाई हो',  'शुभ मंगल ज्यादा सावधान' या सुपर हिट चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकाचे मनोरंजन करणारे अभिनेता गजराज राव (Gajraj Rao) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. सध्या  सोशल मीडियावर अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) लग्नाची चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना फोनसोबत आणण्यास बंदी आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नसोहळ्याच्या या नियमाबद्दल गजराज राव यांनी सोशल मीडियावर नुकतीच पोस्ट शेअर केली आहे. 


गजराज यांनी सोशल मीडियावरील विकी आणि कतरिनाच्या लग्नातील नियमाचा फोटो शेअर करून  पोस्टमध्ये लिहीले, 'जर लग्नात फोन आणण्यास बंदी आहे, तर मला सेल्फी घेता येणार नाही. जर सल्फी घेऊ देणार नसतील तर मी लग्नाला जाणार नाही. ' 



काही दिवसांपूर्वी विकीची बहिण उपसना वोहरा यांनी एका मुलाखतीमध्ये विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल कोणीतरी अफवा पसरवत आहे असे सांगितले होते. उपासना यांनी सांगितले होते, 'लग्नाची तयारी तसेच लग्न सोहळा कुठे होणार? या सर्व गोष्टींबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरवण्यात येत आहेत. लग्न तर होत नाहिये, पण लग्नाची माहिती मात्र सर्वांना आहे. बॉलिवूडमधील कलाकारांबद्दल अशा अफवा नेहमी पसरत असतात. या अफवांच्या चर्चा थोडेच दिवस सुरू राहतात. नुकतेच माझे माझ्या भावासोबत (विकी कौशल) बोलणे झाले. मी अजून तरी या गोष्टींवर काही कमेंट करू ईच्छित नाही.'  


संबंधित बातम्या


TRP Report : बड्या पडद्यावरचे सुपरस्टार छोट्या पडद्यावर फेल! अमिताभ, सलमान, रणवीरचा एकही शो टॉप टेनमध्ये नाही


Gadar 2 : तारा सिंह आणि सकिनाची जोडी पुन्हा येतेय, शूटिंगचे फोटो व्हायरल


Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना हसू अनावर, दिवसागणिक सदस्यांमधील नात्यात बदल