FIR Against Director Vikran Bhatt: बॉलिवूडचे (Bollywood News) सुप्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट (Vikran Bhatt) आणि त्यांची पत्नी श्वेकांबरी भट्ट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भट्ट पती-पत्नीसह उदयपूर (Udaipur) येथील दिनेश कटारिया यांच्यासह आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे (Indira IVF Fertility Clinic) मालक आणि डॉक्टर डॉ. अजय मुरडिया यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दिग्दर्शक आणि त्याच्या साथीदारांनी माझ्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ चित्रपट बनवण्याचं आमिष दाखवलं. तसेच, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर 200 कोटी रुपये कमवण्याचं आश्वासनही दिलं असा आरोप डॉक्टरांनी तक्रारीत केला आहे.

Continues below advertisement


डॉ. अजय यांनी राजस्थानातील (Rajasthan) उदयपूर येथील भूपालपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यांनी आरोप केलाय की, सुरुवातीला आश्वासन देऊन त्यांनी 31 मे 2024 रोजी 2.5 कोटी रुपये पाठवले. त्यानंतर, त्यांना चार चित्रपटांचं आश्वासन देण्यात आले आणि ते पैसे सतत हस्तांतरित करत राहिले. एकूण 30 कोटींहून अधिक रकमेचा अपहार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चित्रपट पूर्ण झाले, एक अर्धवट पूर्ण झाला आणि चौथा चित्रपट, 'महाराणा-रण'चं शुटिंग सुरूच झालेलं नाही, ज्यावर सुमारे 25 कोटी रुपये खर्च झाले.


विक्रम भट्ट आणि इतर 8 जणांविरिद्ध FIR 


FIR मध्ये नमूद माहितीनुसार, डॉ. अजय यांनी सांगितलं की, ते एका कार्यक्रमात दिनेश कटारिया यांना भेटले होते, त्यांनी त्यांना त्यांच्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ बायोपिक बनवण्याचा सल्ला दिला. दिनेश यांनी त्यांना सांगितलं की, ते दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना ओळखतात आणि त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. जर त्यांनी बायोपिक बनवला तर सर्वांना त्यांच्या पत्नीबद्दल माहिती मिळेल, त्यांच्या कामाबद्दल माहिती मिळेल आणि चित्रपटाच्या खर्चाच्या चार ते पाच पट नफाही मिळेल. अजय यांना खात्री पटली आणि त्यांनी होकार दिला. त्यानंतर ते दिनेशसोबत 25 एप्रिल 2024 रोजी मुंबईला गेले आणि मुंबईतील वृंदावन स्टुडिओमध्ये दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना भेटले. त्यावेळी मी सर्वकाही सांभाळून घेईन, कसलीही चिंता करू नका, अशी हमी दिग्दर्शकांनी दिली. अजयला फक्त वेळोवेळी पैसे पाठवायचे होते आणि दिनेश सर्व हिशेब सांभाळायचा.


इंदिरा IVF च्या डॉक्टरांचे आरोप नेमके काय? 


डॉक्टर अजय यांनी पुढे बोलताना सांगितलं की, विक्रम भट्ट यांनी त्यांना दुसऱ्या चित्रपटातही गुंतवणूक करण्यास सांगितलं होतं. विक्रम यांनी मला सांगितलंय की, "तुम्ही एका बायोपिकमध्ये गुंतवणूक करत असल्यानं, माझ्याकडे आणखी एक फिल्म प्रोजेक्ट सुरू आहे. जर तुम्ही त्यासाठीही निधी दिला तर तुम्हाला मोठा नफा मिळू शकेल..." त्यांनी मला आश्वासन दिलं की, पैसे पूर्णपणे परत केले जातील. भट्ट यांनी असंही नमूद केलेलं  की, त्यांची पत्नी आणि मुलगी देखील चित्रपट निर्मितीमध्ये जोडल्या गेल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


What Are Blue Family Entertainers: 'ब्लू फॅमिली एंटरटेनर' फिल्म्स म्हणजे काय? तुम्ही पाहिल्यात का 'या' फिल्म्स?