पुणे: शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात (Weather Update) मोठी घट होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात (cold wave) कमी-जास्त होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला आहे. पुणे शहराचं तापमान सरासरी 9.8 अंशावर आलं आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल पुण्यात 9.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. (cold wave)
Pune Weather Update : तापमानाचा पारा आणखी घटण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला
पुणे शहरात पहाटे आणि रात्री थंडीची तीव्रता अधिक आहे तर दिवसा सूर्यप्रकाश असला तरी हवेमध्ये गारवा टिकून असल्याने थंडीची जाणीव करून देणारी हुडहुडी दिसून येत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात किमान तापमानात रविवारीपासून (दि. १६) मोठ्या प्रमाणात घट होण्यास सुरूवात झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात बोचरी थंडी जाणवत आहे. पुण्यातही गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांगलीच थंडी जाणवू लागली आहे. थंडीमुळे रात्री ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठल्याने पुणेकरांना हुडहुडी भरायला सुरूवात झाली आहे. पुणे शहराचं तापमान सरासरी 9.8 अंशावर आलं आहे. पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं, मात्र काल पुण्यात 9.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तापमानाचा पारा आणखी घटण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
शिवाजी नगर- 10.8पाषाण-9.8लोहगाव-15.3 चिंचवड-16.3मगरपट्टा-16
Nashik Weather Update : नाशिक जिल्ह्यातील निफाडचा पारा घसरला
नाशिक जिल्ह्यातील निफाडचा पारा घसरला. गेल्या 24 तासात 2 या अशांनी पारा खाली आला असून या मोसमातील 6.9 अंश सेल्सिअस एवढ्या निचाकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काल 8. 3 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद करण्यात आली होती त्यात आज घट झाली असून जागोजागी शेकोटी पेटवून थंडी पासून संरक्षण केले जात आहे.
Bhandara Weather Update : भंडाऱ्याला हवामान विभागाचा थंडीचा येलो अलर्ट
उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्यानं संपूर्ण महाराष्ट्रसह भंडारा जिल्ह्यातही हुळहुळी भरणाऱ्या थंडीनं भंडारा जिल्हा गारठला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून काही ठिकाणी पारा दहा अशांच्याही खाली घसरला आहे. पुढच्या काही दिवसांत मध्य भारतात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज असून महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांसह भंडारा जिल्ह्याला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. भंडारा जिल्ह्यात मागील काही दिवसात थंडीचा जोर वाढल्याचं जाणवू लागलं आहे. वाढत्या थंडीमुळं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्याचाही तापमान 10 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं या हुडहुडी भरणाऱ्या थंडीतही भंडाराकर अगदी सकाळपासूनच मॉर्निंग वॉकला निघत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. आहिल्यानगर, जळगाव, नाशिक, यवतमाळ, पुणे, मालेगाव, महाबळेश्वर, भंडारा, अमरातवी, नागपूर, वाशिम, गोदिंया येथील पारा 11अंशांपेक्षाही खाली गेला.