What Are Blue Family Entertainers: आजही मनोरंजनाचा (Entertainment News) विषय निघाला की, सर्वात आधी चर्चा फक्त सिनेमांचीच रंगते. मोठ्या पडद्यावर संपूर्ण कुटुंबासोबत पाहिले जाणारे फुल्ल ऑफ ड्रामा आणि रोमँटिक कॉमेडी सिनेमे (Romantic Comedy Movies) आजच्या ओटीटीच्या (OTT) जमान्यातही प्रेक्षकांना भूरळ घालतात. गेल्या कित्येक वर्षांपासून मॉडर्न रोमांटिक कॉमेडीनं प्रेक्षकांना खळखळवून हसवलं,  रडवलं आणि पुन्हात प्रेमात पडायला भाग पाडलं. यापैकीच एक असलेला सिनेमा सध्या प्रेक्षकांची मनं जिंकतोय, तो म्हणजे, 'दे दे प्यार दे 2'. हा सिनेमा आपल्या पहिल्या फिल्म सारखाच लोकांना खळखळून हसवू शकलाच, पण पहिल्या सिनेमाप्रमाणेच मनोरंजनही करू शकला. पण, तुम्हाला माहितीय का? अशाच सिनेमांना  'ब्लू फॅमिली एंटरटेनर फिल्म्स' (Blue Family Entertainers Films) असं म्हटलं जातं. 

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांत रिलीज झालेल्या काही 'ब्लू फॅमिली एंटरटेनर फिल्म्स'वर एक नजर टाकुयात. अलिकडे या फिल्म्स रिलीज झाल्या असून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान मिळवलं आहे. असे सिनेमे खरोखर कौटुंबिक मनोरंजन करणारे आहेत. 

'ब्लू फॅमिली एंटरटेनर' फिल्म्सची यादी

Continues below advertisement

दे दे प्यार दे 2 (De De Pyaar De 2)

'दे दे प्यार दे' सिनेमाचा हा सीक्वल मनोरंजनाच्या प्रत्येक पैलूवर खरा उतरतो. अजय देवगण आणि आर. माधवन यांची मजेशीर भांडणं संपूर्ण सिनेमात प्रेक्षकांना खळखळून हसवतात. रकुल प्रीत सिंहच्या सीन्स चोरीच्या परफॉर्मेंसपासून ते मीजान जाफरीच्या स्वतःच्याच वडिलांसोबत, ओजी डान्स गुरू जावेद जाफरीसोबतच्या एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्सपर्यंत प्रेक्षक खळखळून हसतात. 

सनी संस्कारी की तुलसी कुमारी (Sunny Sanskari Ki Tulsi Kumari)

ब्रेक-अप्स आणि लग्न यांच्याबाबत सतत येणारे मजेशीर ट्वि्स्ट प्रेक्षकांना फ्रेश, फील-गुड अनुभव देतात. वरुण धवन आणि जान्हवी कपूरची अट्रॅक्टिव्ह केमिस्ट्री आणि रोहित सराफ, सान्या मल्होत्राची स्वीट बॉन्डिंग प्रेक्षकांना खूप आवडली. 

तेरी बातों में ऐसा उलझा जिया (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya)

एखादी व्यक्ती, म्हणजे, माणूस एखाद्या रोबोटच्या प्रेमात पडला तर? विचार केलाय का कधी? शाहिद कपूर आणि कृति सेननचा हा सिनेमा भन्नाट आहे. तुम्ही चुकूनही विचार करू शकत नाही, अशा अनेक गोष्टी या सिनेमात घडतात. त्यात शाहिद कपूर आणि कृति सेननची ऑन स्क्रिन केमिस्ट्री खिळवून ठेवते. यूनिक कॉन्सेप्ट, फनी मोमेंट्स प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aishwarya Sharma Cryptic Post On Divorce Rumors: घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगला वैतागली ऐश्वर्या; क्रिप्टिक पोस्टमधून ठणकावून सांगत म्हणाली...