Disha Patani : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. दिशा तिचे वर्क आऊटचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. तिच्या पोस्टला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. नुकताच दिशानं तिचा एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला अभिनेता टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ (Ayesha Shroff) आणि बहिणी कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) यांनी कमेंट करत दिशाचं कौतुक केलं आहे.  


दिशानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'रॅक पुल 5 रेप्स 80 किलो ग्रॅम', या व्हिडीओमध्ये दिशा ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लॅक शॉर्ट अशा लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला टायगरची आई आयशा श्रॉफ यांनी कमेंट केली, 'बिस्ट' तर टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ कमेंट करत म्हणाली, 'यू आर फायर' टायगरची बहिण कृष्णा आणि दिशा या जवळच्या मैत्रिणी आहेत. 






दिशाला इंस्टाग्रामवर जवळपास  48.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा राधे हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभूदेवानं केलं होतं. त्यानंतर आता एक व्हिलन 2 या आगामी चित्रपटात दिशा प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात दिशासोबतच तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम हे देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha