Fahadh Faasil Birthday : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता फहाद फासिलचा (Fahadh Faasil) आज 40 वा वाढदिवस. 'पुष्पाः द राइज' (Pushpa: The Rise) या चित्रपटातील त्यानं साकारलेल्या भंवर सिंह शेखावत या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. फहाद हा मल्याळम चित्रपटसृष्टीतील चर्चेत असणारा अभिनेता आहे. जाणून घेऊयात फहादबद्दल....
फहादचा पहिला चित्रपट ठरला होता फ्लॉप
फहाद फासिलचा जन्म 8 ऑगस्ट 1982 रोजी केरळमधील आलप्पुषामध्ये झाला. फहादचे वडील हे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. फहादनं त्याच्या करिअरची सुरुवात 2002 मध्ये रिलीज झालेल्या 'कायथुम दुरथ'या चित्रपटामधून केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याच्या वडिलांनी केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यामुळे फहादनं अभिनयक्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता.
असा केला कमबॅक
'कायथुम दुरथ' हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर फहादनं अभिनयसोडून शिक्षणपूर्ण करण्याचा निर्णय घेतला. शिक्षणासाठी तो युनायटेड स्टेट येथे गेला. तिथे गेल्यानंतर त्याला पुन्हा अभिनयाची आवड निर्माण झाली. अभिनेता इरफान खानचा 'यूं होता तो क्या होता' हा चित्रपट फहादनं पाहिला. या चित्रपटामधून त्याला खूप प्रेरणा मिळाली. त्यामुळे त्यानं पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.
फहादनं आत्तापर्यंत 50 चित्रपटांमध्ये काम केलं. 2018 मध्ये फहादला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याच्या 'सी यू सून', 'जोजी' आणि 'मालिक' याी चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पुष्पा आणि विक्रम या चित्रपटातील अभिनयानं फहादनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. 2014 मध्ये फहादनं नजरिया नजीमसोबत लग्न केलं.
वाचा इतर बातम्या:
- Entertainment News Live Updates 8 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- The Kapil Sharma Show : 'कपिल शर्मा'चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; तुम्हीही होऊ शकता समील, जाणून घ्या...