Lokmanya Tilak Birth Place :  राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांच्या जन्मस्थळावरुन आता नवा वाद उभा होण्याची शक्यता आहे. याचं कारण आहे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केलेलं नवं वक्तव्य. लोकमान्य टिळक यांचा जन्म दापोली तालुक्यातील चिखलगाव (Ratnagiri Dapoli) येथे झाला आहे. मात्र रत्नागिरी शहरातील ज्या घरात लोकमान्य टिळकांचा जन्म झाला, असे सांगण्यात येते ते ठिकाण काल्पनिक असल्याचा दावा सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला आहे. दापोली तालुक्यातील चिखलगाव येथील लोकसाधनेच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले.


शरद पोंक्षे हे आपल्या बेधडक वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असतात. विविध विषयांवर ते आपली मतं मांडताना दिसतात. यामुळं बऱ्याचदा ते वादात देखील सापडतात. आता लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळावरुन त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर देखील नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  


सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे


नुकतच पोंक्षे यांनी सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे, असं वक्तव्य पुण्यात केलं होतं. महाराष्ट्रात एकच गोळवलकर विद्यालय का आहे. प्रत्येक गावात असे विद्यालय हवे, तसेच सावरकर यांच्यावर कार्यक्रम व्हायला हवेत, असं मत पोंक्षे यांनी व्यक्त केलं होतं. रोज सकाळी उठल्यावर विरोधकांना पण सावरकर लागतात. ही मुलं बघा अन दिल्लीतला पण मुलगा बघा. या मुलांना कळतंय आणि एवढे मोठे झाले तरी त्यांना अजून गोळवलकर बोलता येत नाही, असे म्हणत पोंक्षे यांनी टीका केली होती. 
  
सावरकर यांचे मोठेपण मान्य करणे म्हणजे काही जणांना राजकीय तोटा वाटतो. सावरकर यांच्यावर बोलणारे आणि आक्षेप घेणारे जास्त आहेत असेही पोंक्षे म्हणाले होते.  सावरकर फार मोठा माणूस होऊन गेले. मात्र एवढ्या मोठ्या देशभक्तांचा जेवढा अपमान केला तो आतापर्यंत कोणाचाच झालं नसेल असेही पोंक्षे म्हणाले होते. सावरकर यांची दहशत वाढली पाहिजे, यापुढे सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे असेही ते म्हणाले. सावरकर यांची दहशत ब्रिटिशांना होती, काँग्रेसला पण आहे अन् ती दहशत आणखी वाढली पाहिजे असेही शरद पोंक्षे म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर टीका देखील झाली होती.