Vidya Balan: बॉलिवूडचे अनेक चित्रपट सध्या पुर्नप्रदर्शित होत असल्यानं चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून अनेक  सिनेमांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सुजॉय घोषचा  2012 साली प्रदर्शित झालेला कहानी सिनेमा आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटगृहात सुजॉयची कहानी प्रेक्षकांची दाद मिळवताना दिसतेय. या चित्रपटाला मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे दिग्दर्शक सुजॉयनं या सिनेमाच्या काही आठवणी सांगितल्या. दर्जेदार गोष्ट असूनही केवळ टाईट बजेटमुळे विद्या बालनला शुटिंगदरम्यान कारमध्ये कपडे बदलावे लागत असल्याचा खुलासा या दिग्दर्शकानं केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.


विद्या तेंव्हा मेघना गुलजारांच्या कथेच्या वाचनासाठी संजय गुप्तांच्या कार्यालयात आली होती. तेंव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले. मी तिला त्यादिवशी एक रुपया दिला आणि आपण एकत्र चित्रपट करू असे सांगितले. माझा सुरुवातीचा चित्रपट पडल्यानं ती सहज नाही म्हणू शकली असती. पण तिनं कहाणीची साथ सोडली नाही. तिने मला वाचवले हे कौतूकास्पद असल्याचं सुजॉय म्हणाले.


आमच्याकडे बजेट नसल्यानं व्हॅनिटी व्हॅनला पैसे नव्हते


'कहानी' हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी नुकतीच या चित्रपटाच्या निर्मितीची आठवण करून दिली. हा चित्रपट बनवण्यासाठी किती बजेट होते. हे त्यांनी मॅशेबल इंडियाशी संवाद साधताना सांगितले . ते म्हणाले,आमच्याकडे बजेट नव्हते. त्यामुळे आमच्याकडे व्हॅनिटी व्हॅन नव्हती. आमचे बजेट कमी असल्यामुळे आम्ही शूटिंग काही काळ थांबवू शकलो नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी विद्या बालन हिला कपडे बदलावे लागायचे. तेव्हा आम्ही तिची इनोव्हा रस्त्याच्या मधोमध काळ्या कपड्याने झाकून टाकायचो. ती आत कपडे बदलायची आणि मग बाहेर पडायची.  


दिग्दर्शकानं 12 वर्षांनीही केलं विद्याच्या त्या स्वभावाचं कौतूक


तो अजूनही बॉक्स ऑफिसवर सोनेरी कमाई करण्यासाठी धडपडत असतानाही, विद्याने कहानी साइन करण्यास सहमती दर्शविली आणि तिची कामाची बांधिलकी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यापेक्षा कमी नव्हती, ज्यांच्यासोबत घोष यांनी बदलामध्ये काम केले होते . मुख्य लीड होती आणि SRK ने त्याची निर्मिती केली होती. कहानी 2012 मध्ये रिलीज झाली. यात नवाजुद्दीन सिद्दीकी, परमब्रत चॅटर्जी, सास्वता चॅटर्जी, इंद्रनील सेनगुप्ता, धृतिमान चॅटर्जी, दर्शन जरीवाला आणि इतर कलाकार होते.


हेही वाचा:


Karmayogi Abasaheb : 'कर्मयोगी आबासाहेब' चित्रपटामधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व, बिग बॉस फेम छोटा पुढारीही खास भूमिकेत झळकणार