Samantha-Naga Chaitanya Divorce: साउथचे फेमस जोडपं अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटानंतर तेलंगणातलं वातावरण आता चांगलं तापलंय. तेलंगणाच्या कॅबिनेट मंत्री कोंडा सुरेखा यांनी समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी नागार्जुनने (समंथाचे पूर्व सासरे) मंत्री कोंडा सुरेखा यांच्यावर फौजदारी मानहानीचा शंभर कोटी रुपयांचा खटला दाखल केलाय. 


टाइम्स नऊला दिलेल्या मुलाखतीत नागार्जुन म्हणाला, त्यांनी केलेली निंद माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. असे म्हणत मानहानीचा खटला दाखल करत आक्रमक पवित्रा घेतलाच कारण त्याने सांगितलं. आम्ही मनोरंजन व्यवसायात यापुढे सॉफ्ट टारगेट राहणार नाही हे त्याने स्पष्ट केलं. स्वतःच्या राजकीय फायदांसाठी सेलिब्रिटींची नावे वापरू शकत नाहीत, यावर त्याने भर दिला. 


नुकसान भरपाई म्हणून 100 कोटी रुपयांचा खटला 


साऊथ सुपरस्टार अभिनेत्री समंथा रूथ प्रभू व तिचा पूर्वपती नागा चैतन्य आणि सुपरस्टार नागार्जुन यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला होता. नागार्जुन यांनी केवळ सोशल मीडिया पोस्ट करून हे प्रकरण मिटवले नाही तर त्यांनी तेलंगणाच्या काँग्रेस नेत्या कोंडा सुरेखा यांचा विरोधात मानहानीचा खटला दाखल केलाय. नुकसान भरपाई म्हणून नागार्जुन यांनी कोंडा सुरेखा यांचा विरोधात 100 कोटी रुपयांचा हा खटला उभा केलाय. अभिनेताने यादी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मानहानीचा खटला दाखल केला असून आर्थिक नुकसान भरपाईची मागणी करणारा 100 कोटी रुपयांचा आणखी एक खटला देखील दाखल करण्यात आलाय. 


कोंडा सुरेखांची माफी नाकारली 


समांथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसने त्या कोंडा सुरेखा यांनी गुरुवारी त्यांचे वक्तव्य मागे घेतलाचे म्हटले होते. यानंतर सिने इंडस्ट्रीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कोंडा सुरेखा यांनी मागितलेली माफी ही अपुरी म्हणून नागार्जुन यांनी नाकारली आहे. दुखावलेल्या टिप्पण्यांसाठी त्यांना व त्यांच्या कुटुंबांना संबोधित करण्यात व माफी मागण्यात त्या यशस्वी झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे प्रकरण आता वैयक्तिक राहिले नसल्याचं नागार्जुन म्हणाले. 


राजकीय फायद्यासाठी आमच्या नावाचा वापर करू नका 


नागार्जुन यांनी कोंडा सुरेखा यांच्यावर दाखल केलेला मानहानीचा खटला हा राजकारणांना सेलिब्रिटींची नावे स्वतःचा राजकीय फायदा साठी वापरण्यापासून सावध करेल असे त्यांनी सांगितले. मनोरंजन उद्योग यापुढे सॉफ्ट टारगेट राहणार नाही. मला आशा आहे की त्या महिलेविरुद्धची आमची कायदेशीर कारवाई इतर राजकारणांना आमच्या नावाचा अयोग्य वापर करण्यापासून सावध करेल असे नागार्जुन म्हणाले. नागार्जुन यांच्या या भूमिकेला तेलगू चित्रपट सृष्टीतील  चाहत्यांकडून व दिग्गजांकडूनही मोठा पाठिंबा मिळालेला दिसतोय.


हेही वाचा:


Samantha-Naga Divorce : नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटासाठी 'ही' व्यक्ती कारणीभूत, मंत्र्याचा दावा; समंथाची कडक शब्दात टीका, नागा चैतन्यकडूनही अभिनेत्रीची पाठराखण