SEBI: भांडवली बाजार नियामक संस्था सेबीने म्युच्यूअल फंड (Mutual Fund) मार्केटशी निगडीत मोठा निर्णय घेतला आहे. सेबीने जिओ (Jio) आणि ब्लॅकरॉक (BlackRock) यांना म्युच्यूअल फंडात येण्यास मंजुरी दिली आहे. उद्योगपती मुकेस अंबानी यांच्या नेतृत्त्वातील जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस (Jio Financial Services) च्या म्युच्यूअल फंडातील प्रवेशामुळे या क्षेत्रातील स्पर्धा वाढू शकत. 


दोन्ही कंपन्यांनी 2023 साली एकमेकांशी केला करार 


जिओ फायनॅन्शियलने शुक्रवारी एक्स्चेंज फायलिंगमध्ये याबाबत अधिक माहिती दिली आहे. जिओ फायनॅन्शियलने दिलेल्या माहितीनुसार 3 ऑक्टोबर रोजी ब्लॅकरॉक फायनॅन्शियल मॅनेजमेंटसोबतच्या संयुक्त व्हेंचरला म्युच्यूअल फंडात प्रवेश करण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली आहे. जिओ आणि ब्लॅकरॉक या दोन्ही कंपन्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सेबीकडे सुपूर्द केल्यानंतर त्यांच्या या व्हेंचरला अंतिम मंजुरी दिली जाईल. या दोन्ही कंपन्यांनी जुलै 2023 मध्ये एकमेकांशी करार केलेला आहे. म्युच्यूअल फंड मार्केटमध्ये प्रवेश मिळावा या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे ऑक्टोबर 2023 मध्ये परवान्यासाठी सेबीकडे अर्ज केला होता. या दोन्ही कंपन्या त्यांच्या नव्या प्रकल्पासाठी 15-15 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. 


'चांगला गंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू'


ब्लॅकरॉक आणि जिओच्या या जॉइंट व्हेंचरला मंजुरी मिळाल्यानंतर ब्लॅकरॉक कंपनीच्या रेचल लॉर्ड यांनी प्रतिक्रिया दिली. सेबीच्या या निर्णयामुळे आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही भारतातील कोट्यवधी लोकांना स्वस्त आणि चांगला गंतवणूक पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. जिओ फायनॅन्शियल सर्व्हिस या कंपनीसोबत हातमिळवणी करून आम्ही भारताला बचत करणाऱ्या देशापासून गुंतवणूक करणाऱ्या देशात बदलण्यासाठी प्रयत्न करू. ब्लॅकरॉक आणि जिओ फायनॅन्सियल सर्व्हिसेस या दोन्ही कंपन्या वेल्थ मॅनेजमेंट आणि स्टॉक ब्रोकिंग बिझनेसमध्ये काम करणार आहेत.  


जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस कंपनी 2023 मध्ये शेअर बाजारावर सूचिबद्ध 


जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस  ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय सेवा देता. अगोदर ही कंपनी रिलायन्स उद्योग समूहाची एक उपकंपनी होती. ऑगस्ट 2023 मध्ये ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली.  जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस या कंपनीची उपकंपनी जिओ फायनान्स या कंपनीकडे एनबीएफसीचा परवाना आहे. याच कंपनीची जिओ पेमेंट्स बँक ही आणखी एक उपकंपनी आहे. जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेस या कंपनीला एनबीएफसीतून कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीत बदलण्यास आरबीआयने मंजुरी दिली आहे. 


हेही वाचा :


IPO येण्याआधी स्विगीकडून मोठा निर्णय, आता फक्त 10 मिनिटांत फुड डिलिव्हरी; स्विगी बोल्ट म्हणजे काय?


शेअर बाजार कोमात, 'ही' कंपनी जोमात, एका वर्षात दिलेत 570 टक्क्यांनी रिटर्न्स; आता गुजरातमध्ये 200 कोटी गुंतवणार!


30000 लोकांची फसवणूक, 500 कोटींचा घोटाळा, एल्विश यादव, रिया चक्रवर्तीला नोटीस आलेला HIBOX Scam काय आहे?