Nick Jonas: भारतात सध्या कोल्डप्लेच्या तिकिटांवरून मोठाच गदारोळ झाला होता. सध्या अशाच एका कॉन्सर्टची जोरदार चर्चा आहे. प्रागमध्ये झालेल्या एका निक जोनसच्या (nick Jonas) या कॉन्सर्टमध्ये झालेल्या एका घटनेचे सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. चालू कॉन्सर्टमध्ये निक जोनस स्टेजवरून पळाल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये सध्या चांगलाच गाजतोय..


जोनस डेली न्यूजच्या एका इंस्टाग्रॅम वापरकर्त्यानं शेअर केलेल्या या क्लिपमध्ये निक जोनस प्रेक्षकांकडे पाहतो आणि अचानक धावू लागतो. स्टेजवरून उतरताना जवळच उभ्या असणाऱ्या त्याच्या सुरक्षारक्षकालाही तो हातवारे करतो आणि दोघोही मंचावरून कॉन्सर्टच्या मधूच धावत सूटतात. दुसऱ्या  एका व्हिडिओमध्ये निकला कोणीतरी लेझर मारत असल्याचं दिसल्यानंतर तो धावत गेल्याचे दिसले. दहा मिनिटे हा कॉन्सर्ट थांबवण्यात आला. त्या व्यक्तीला घटना स्थळावरून हलवण्यात आले. 


नेटकऱ्यांनी ठेवले शोच्या सुरक्षिततेवर बोट


या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी कॉन्सर्टच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधलंय. निक जोनसच्या सुरक्षेवरही नेटकऱ्यांनी बोट ठेवलंय. इंस्टाग्रामवर बँडच्या जोनास डेली न्यूज फॅन पेजने व्हिडिओ शेअर केला आहे. मथळा वाचला: “जोनास ब्रदर्सला आज रात्री प्रागमध्ये त्यांचा शो थोडक्यात थांबवावा लागला जेव्हा प्रेक्षकांमधील कोणीतरी निकच्या दिशेने एक लेझर दाखवला. त्या व्यक्तीला कार्यक्रमाच्या ठिकाणाहून काढून टाकण्यात आले आणि शो सुरूच राहिला. हा सारा प्रकार नेटकऱ्यांना चांगलाच उचलून धरलाय. धडकी भरवणारा आणि भितीदायक असल्याचं त्याच्या चाहत्यांनी म्हटलंय.






भितीदायक आणि  धडकी भरवणारा प्रकार


लाइव्ह कॉन्सर्ट सुरु असताना कोणीतरी निक जोनसवर लेझर मारल्यानं आपल्या जीवाला धोका असल्याचे जाणवून, निक जोनासने त्वरीत त्याच्या सुरक्षेसाठी धोक्याचे संकेत दिले आणि स्टेजवरून पळ काढला. काही क्षणांनंतर, जो आणि केविन जोनास यांनीही स्टेज सोडला आणि वादग्रस्त व्यक्तीला कार्यक्रमस्थळावरून हटवले जाईपर्यंत मैफिली थांबवण्यात आली. हा सगळा प्रकार भितीदायक असल्याचं सांगत नेटकऱ्यांनी निक जोनसवर ओढावलेल्या या प्रसंगाविषयी चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.


हेही वाचा:


Akshay Kumar Ad: 'हिरोगिरी फू फू करने में नही...'अक्षयची ती जाहिरात हटवण्याचा निर्णय, कारण काय?