AKshay Kumar Ad: कोणत्याही चित्रपटगृहाता सिनेमा पहायला जाऊन बसताच चित्रपट सुरु होण्यापूर्वी लागणारी अक्षय कुमारची ती जाहिरात सर्वांनाच माहिती आहे. हिरोगिरी फू फू करने में नहीं.. असं म्हणत मोठ्या पडद्यावर येणारी ही जाहिरात आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जाहिरातीवर समाजमाध्यमावर अनेकजण मिम्स बनवत असतात. पण आता चित्रपटगृहात आता ही ॲड दिसणार नाही. सेन्सॉर बोर्डानं ही जाहिरात बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे.


हॉस्पिटलबाहेर सिगारेट फुंकत उभारलेला नंदू आणि सायकलवरून येणाऱ्या अक्षय कुमार त्याला धुम्रपानापासून थांबवतो आणि महिलांच्या मासिक पाळीसाठी लागणारे सॅनिटरी पॅड हातात देतो. मासिक पाळीत घाणेरडे कपडे वापरल्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी तो महिलांना पॅड खरेदी करण्याचा सल्ला नंदूला देत असतो. आता अक्षय कुमारची ही जाहिरात हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


ही जाहिरात का हटवण्यात आली?


सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या आदेशानुसार २०१८ मध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि सिगारेट ओढणाऱ्या नंदूची जाहिरात मोठ्या पडद्यावर सर्वाधिक लावण्यात येण्यात येणारी जाहिरात होती. आता ही जाहिरात काढून त्या जागी एक नवीन जाहिरात येणार असल्याचे वृत्त आहे. ज्यामध्ये तंबाखू, धुम्रपान करणं हानीकारक असल्याचं सांगण्यात येणार आहे. तंबाखू सोडण्याचे फायदेही सांगणारी ही जाहिरात येणार असल्याने आता अक्षय कुमार आणि नंदूची ही जाहिरात  काढून टाकण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.


जिगरा, विकी विद्या ..वेळी जाहिरात दिसली नाही


नुकताच प्रदर्शित झालेला आलिया भट्टचा जिगरा या चित्रपट आणि तृप्ती डिमरी आणि राजकुमार रावचा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ या दोन्ही चित्रपटांदरम्यान अक्षय कुमार आणि नंदूची जाहिरात दाखवण्यात आली नाही. आता नवी जाहिरात येईल तेंव्हा ती दाखवली जाण्याचा अंदाज लावण्यात येत आहे.


कधीपासून दाखवण्यात येते ही जाहिरात?


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने मिळून केलेल्या धुम्रपान धोक्याचं असल्याच्या जाहिराती दाखवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर २०१२ पासून अशा जाहिराती दाखवण्यात येतात.  चित्रपट सुरु होताना, मध्यांतरात जाहिरात दाखवण्यात यावी असे आदेश होते. यात कर्करोगाविषयीचा धोका सांगणाऱ्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या. यात अक्षय कुमारची तंबाखू सेवनावर डोळ्यात अंजन घालणारी जाहिरात २०१८ पासून मोठ्या पडद्यावर दिसत होती. आता ही जाहिरात चित्रपटगृहांमधून हटवण्यात आली आहे.