Entertainment News Live Updates : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 12 Jun 2023 04:03 PM
The Archies New Poster : 'द आर्चीज'चं नवं पोस्टर आऊट

The Archies : 'द आर्चीज' (The Archies) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सिनेमात अनेक स्टार किड्स झळकणार आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.





Heeramandi : संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'ची रिलीज डेट जाहीर

Sanjay Leela Bhansali Heeramandi Web Series : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हीरामंडी' (Heeramandi) ही बहुचर्चित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सीझनचं शूटिंग या महिन्याच्या शेवटापर्यंत संपेल असा अंदाज वर्तवला जात आहे. 





Anupama : काव्याची गुडन्यूज ऐकून समर संतापला; मायाच्या वेडेपणाला अनुजचं सडेतोड उत्तर

Anupama Serial Latest Update : रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) यांच्या 'अनुपमा' (Anupama) या मालिकेत दिवसेंदिवस रंजक ट्विस्ट येत आहेत. मालिकेचा आगामी भाग खूपच नाट्यमय असणार आहे. एकीकडे काव्याची गुडन्यूज ऐकून समर संतापणार आहे. तर दुसरीकडे मायाच्या वेडेपणाला अनुज सडेतोड उत्तर देताना दिसणार आहे. 





Tuzech Mi Geet Gaat Aahe: स्वराजने मंजुळासोबत काढला सेल्फी; 'तुझेच मी गीत गात आहे’ चा प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाल्यानं आता मालिकेत  रंजक वळणावर आलेलं बघायला मिळत आहे. या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराज हा मंजुळासोबत सेल्फी काढतो. 





Gadar 2 Teaser Out : 'दामाद है वो पाकिस्तान का उसे टीका लगाओ वरना..'; सनी देओलच्या 'गदर 2'चा धमाकेदार टीझर आऊट

Sunny Deol Gadar 2 Teaser Out : सनी देओलच्या (Sunny Deol) आगामी 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. तारा सिंह आणि सकीनाची जोडी 21 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'गदर 2' या सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.



Shashank Ketkar: 'ज्या वाड्यात माझा जन्म झाला ...'; शशांक केतकरनं साताऱ्यातील नेने वाड्याचे फोटो केले शेअर

Shashank Ketkar: अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतो. शशांकच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. नुकतीच शशांकनं एक खास पोस्ट  शेअर केली आहे. शशांकनं साताऱ्यामधील नेने वाड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला त्यानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 



Adipurush : 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर करणार धमाका; अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी विकले गेले 36,000 तिकिटे

Adipurush Advance Booking : 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाची देशभरात चांगलीच क्रेझ आहे. 16 जून 2023 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी या सिनेमाचे 36,000 पेक्षा अधिक तिकीटे विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. 

Aai Kuthe Kay Karte : संजनाच्या वाढदिवशी वीणाचं कौतुक केल्याने अनिरुद्धवर चिडणार संजना; 'आई कुठे काय करते'च्या प्रोमोने वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आता या मालिकेच्या आगामी भागात संजनाच्या वाढदिवशी वीणाचं कौतुक केल्याने संजना अनिरुद्धवर चिडलेली दिसणार आहे.





Madhu Mantena Ira Trivedi Wedding : वयाच्या 48 व्या वर्षी मधु मंटेना दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर

Madhu Mantena Ira Trivedi Wedding : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-निर्माता मधु मंटेना (Madhu Mantena) योग प्रशिक्षक इरा त्रिवेदीसोबत (Ira Trivedi) लग्नबंधनात अडकला आहे. मधु आणि इराच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वयाच्या 48 व्या वर्षी मधु मंटेना दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Amitabh Bachchan And Rajinikanth : अमिताभ बच्चन आणि रजनीकांतची जोडी पुन्हा दाखवणार आपला जलवा


Amitabh Bachchan And Rajinikanth Movie : मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रजनीकांत (Rajinikanth) यांची गणना होते. दोघांनीही त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एका पेक्षा एक सिनेमे दिले आहेत. दोघांचेही चाहते त्यांच्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता 32 वर्षांनी बिग बी अन् थलायवा एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


KKK 13 : 'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगदरम्यान नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत


Nyrraa Banerji  Injured KKK 13 Shooting : 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13)  हा रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) साहसी खेळ असणारा कार्यक्रम आहे. 'खतरों के खिलाडी 13'चं सध्या दक्षिण आफ्रिकेत शूटिंग सुरू आहे. दरम्यान या शूटिंगदरम्यान स्पर्धकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता शूटिंगदरम्यान नायरा बॅनर्जीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. 


Animal Pre Teaser Out : हातात हातोडा, तोंडात सिगारेट; रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'चा प्री-टीझर आऊट


Animal Pre-Teaser Released : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) 'तू झुठी मैं मक्कार' या सिनेमानंतर संदीप रेड्डी वांगाच्या आगामी 'अॅनिमल' या सिनेमात दिसणार आहे. रणबीरचे चाहते गेल्या काही दिवसांपासून या बहुचर्चित सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. आता निर्मात्यांनी या सिनेमाचा प्री टीझर रिलीज केला आहे. या सिनेमाच्या प्री-टीझरमध्ये रणबीरचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. 


संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित 'अॅनिमल' या सिनेमाचं कथानक खूपच दमदार असणार आहे. या सिनेमात रणबीर कपूरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.