Entertainment News Live Updates टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 02 Aug 2023 07:28 PM
Nitin Desai Suicide: अक्षय कुमार ते संजय दत्त; नितीन देसाई यांना बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

Nitin Desai:  कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai)  यांनी आत्महत्या केली आहे. नितीन देसाई (ND Studio) यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.. अनेक कलाकारांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच काही राजकीय नेत्यांनी ट्वीटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.  तसेच बॉलिवूड कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Nitin Desai Suicide: सुधीर मुनगंटीवार ते सुप्रिया सुळे; राजकीय नेत्यांनी नितीन देसाई यांना वाहिली श्रद्धांजली

Nitin Desai Suicide:  प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत त्यांचे आयुष्य संपवलं आहे. नितीन यांच्या आत्महत्येनं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच काही राजकीय नेत्यांनी ट्वीटच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. 


 


Nitin Desai : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या; एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य

Nitin Desai Suicide : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gautami Patil : हुल्लडबाजांचा गोंधळ, दगडफेक; गौतमी म्हणाली,"...तर मी कार्यक्रम बंद करेल"

Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. गौतमीचा जिथे कार्यक्रम तिथे राडा होणारच. असंच काल (1 ऑगस्ट) अहमदनगरच्या (Ahmednagar) नागापूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ झाला. तसंच या कार्यक्रमावेळी दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. 


Gautami Patil : हुल्लडबाजांचा गोंधळ, दगडफेक; गौतमी म्हणाली,"...तर मी कार्यक्रम बंद करेल"

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Made In Heaven 2 trailer: लग्न, ड्रामा आणि इमोशन्स; बहुप्रतिक्षित 'मेड इन हेवन 2' सीरिजचा ट्रेलर रिलीज


Made In Heaven 2 trailer:  मेड इन हेवन (Made In Heaven)  या सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मेड इन हेवन ही सीरिज  2019 मध्ये प्रदर्शित झाली. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकताच मेड इन हेवन-2 (Made In Heaven 2) या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


Vaishali Mhade : मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे : वैशाली माडे


Vaishali Mhade : लोकप्रिय गायिका वैशाली माडे (Vaishali Mhade) सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मुळे (Saregamapa Little Champs) चर्चेत आहे. 'सारेगमप' या लोकप्रिय कार्यक्रमाची वैशाली स्पर्धक होती. आता 'सारेगपम लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचं परीक्षण करताना ती दिसणार आहे. दरम्यान "मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे", असं वक्तव्य वैशाली माडेने केलं आहे. 


'सारेगमप' (Saregamapa) या कार्यक्रमाबद्दल बोलताना वैशाली माडे म्हणाली,"सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाने महाराष्ट्राला पंचरत्न मिळवून दिली आहेत. या मंचाने आजवर अनेक गायक घडवले. एक स्पर्धक म्हणून सुरू झालेला या मंचावरचा प्रवास आता परिक्षकापर्यंत येऊन पोहोचला आहे. याचा खूप आनंद आहे". 


Angus Cloud : हॉलिवूड अभिनेता एंगस क्लाउडचं वयाच्या 25 व्या वर्षी निधन; वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने सोडले प्राण


Angus Cloud Passed Away : हॉलिवूड इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. हॉलिवूड अभिनेता आणि 'यूफोरिया' (Euphoria) फेम एंगस क्लाउडचं निधन (Angus Cloud) झालं आहे. वयाच्या 25 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने अभिनेत्याने प्राण सोडले आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.