चंदीगढ: महाराष्ट्रात मराठी नववर्ष गुढी पाडव्याची तयारी सुरू असून जगभरातील मुस्लिम बांधव रमजान ईद (Ramadan Eid) साजरी करण्यासाठी उत्साह असल्याचे दिसून येत आहे. देशभरातही त्याच पार्श्वभूमीवर ईफ्तार पार्ट्याचं आयोजन करुन सामाजिक सलोखा जपला जात आहे. भाजपनेही पुढाकार घेत 32 लाख मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सौगात ए मोद कीट वाटपाचे नियोजन केले आहे. गुढी पाडवा आणि रमजान ईदच्या सुट्टीचं प्लॅनिंग करुन उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची योजना हिंदू-मुस्लीम बांधव आहेत. देशभरात रमजान ईदच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, हरयाणा सरकारने रमजान ईदची सुट्टी रद्द केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. हरयाणाचे (Haryana) मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनी रमजान ईदच्या सुट्टीला गॅझेटेड हॉलिडेऐवजी रजिस्टर हॉलिडे केलं आहे. विकेंड असल्याने शनिवार व रविवारी सुट्टी असून मार्च एन्ड असल्याने सोमवारी आर्थिक वर्षे समाप्ती आहे. त्यामुळे, सरकारने हा निर्णय घेण्यात आल्याचं नोटीफिकेशनमध्ये म्हटलं आहे. 

एकीकडे गुढी पाडवा आणि ईद या दोन्ही सणाची उत्सुकता असताना दुसरीकडे मार्च एन्ड असल्याने प्रशासकीय कामे, बँकींग क्षेत्रातही धावपळ सुरू आहे. त्यातच,  आर्थिक वर्षाच्या समाप्तीची तारीख लक्षात घेत हरयाणा सरकारने रमजान ईदच्या सुट्टीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, यंदाची ईदची सुट्टी ही पर्यायी स्वरुपात मिळेल, असे नोटीफिकेशन हरयाणाचे मुख्य सेक्रेटरी अनुराग रस्तोगी यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आले आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्यादिवशी आर्थिक व्यवहारांसदर्भाने कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

हरयाणा सरकारच्या या निर्णयामुळे मुस्लिम बांधवांची काहीशी निराशा झाली असून प्रशासनात काम करणाऱ्या मुस्लिम बांधवांना पर्यायी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे, रमजान ईदची सार्वजनिक सुट्टी आता हरयाणात पर्यायी झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे, हरयाणा राज्यात रमजान ईदच्या दिवशी सर्व कार्यालय सुरुच राहणार आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर काहींनी थेट नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र, रिझर्व बँकेनेही कर्मचाऱ्यांसाठी 31 मार्च रोजीची सुट्टी रद्द केली आहे. आर्थिक वर्षसमाप्ती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

रजिस्ट्रेड हॉलिडे काय असतो?

रजिस्ट्रेड हॉलिडे म्हणजे हा पर्यायी हॉलिडे असतो. या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी घ्यायची की नाही, हे त्यांनी ठरवायचे असते. तसेच, जे कर्मचारी यादिवशी काम करतात, त्यांना हीच सुट्टी नंतर घेता येते. 

हेही वाचा

मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय