Entertainment News Live Updates 7 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 07 Oct 2022 01:58 PM
Varhadi Vajantri: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रसिकांच्या भेटीला येणार मकरंद अनासपुरेंचा 'वऱ्हाडी वाजंत्री'!

Varhadi Vajantri: सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे आणि विनोदाचे बादशहा विजय पाटकर ही जोडी त्यांचा आगामी विनोदी चित्रपट ‘वऱ्हाडी वाजंत्री’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.


 





PHOTO : मोकळे केस, गळ्यात नेकलेस अन् सिंदूर, नुसरत जहाँ लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर तिच्या हॉटनेसने सर्वांनाच घायाळ करत आहे.  नुकतेच नुसरतने तिचे अतिशय सुंदर आणि पारंपारिक अवतारातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय सुंदर दिसत असून, तिचा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. नुसरतचे हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पारंपारिक बंगाली साडीमध्ये दिसत आहे.


 





Bigg Boss Marathi 4 : आज 'बिग बॉस'च्या घरात पडणार पैशांचा पाऊस

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून या पर्वातील स्पर्धक आणि त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे चर्चेत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये काल 'चान्स पे डान्स' या उपकार्यात टीम A विजयी ठरली. आज बिग बॉसच्या घरात पैशांचा पाऊस पडणार आहे. तसेच या पर्वातील पहिलं कॅप्टन्सी कार्यदेखील पार पडणार आहे. 





Zee Talkies Comedy Awards : 'हम भी कुछ कम नही' म्हणत ज्येष्ठ अभिनेते थिरकणार

Zee Talkies Comedy Awards : 'झुकेगा नही साला' म्हणत साऊथच्या 'पुष्पराज'ने चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमातील समंथाचं 'ऊ अंटवा मावा ऊ ऊ अंटवा मावा' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. आता या गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री मराठीतील चार ज्येष्ठ अभिनेत्यांसोबत डान्स करणार आहे. 'झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड'मध्ये (Zee Talkies Comedy Awards) प्रेक्षकांना हा डान्स पाहायला मिळणार आहे. 

Rakhi Sawant : ‘मला मुख्यमंत्री करा’ राखी सावंतची अजब मागणी, सोशल मीडियावर व्हिडीओ चर्चेत!

यापूर्वी हेमा मालिनी यांनी देखील एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्या राखी सावंतच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल बोलल्या होत्या. हेमा मालिनी यांच्या या व्हिडीओवर राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली की, ‘आज मी खूप आनंदी आहे, हे गुपित होते की यावेळी मी 2022मध्ये निवडणूक लढवणार आहे. बरं, पंतप्रधान मोदीजी आणि आमचे अमित शाहजी यांची घोषणा करणार होते… पण मी भाग्यवान आहे की माझ्या आवडत्या अभिनेत्री ड्रीमगर्ल हेमा मालिनीजी यांनी यावेळेस मी निवडणुकीत उभी आहे, अशी घोषणा केली आहे.


 





Ameya Khopkar : भाजपने विरोध केलेल्या आदिपुरुष सिनेमाला मनसेचा पाठिंबा

Ameya Khopkar On Adipurush :  भाजपने 'आदिपुरुष' (Adipurush) या सिनेमाला विरोध दर्शवत हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. पण आता या सिनेमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी यासंदर्भात एक पत्र जाहीर केलं आहे. ओम राऊत यांच्याकडून अभ्यासपूर्ण मांडणी केल्याचा दावा अमेय खोपकर यांनी केला आहे. 

BB16 Weekend ka Vaar : 'बिग बॉस'च्या घरात होणार भाईजानची एन्ट्री; अब्दू रोजिकला देणार खास भेट

'बिग बॉस 16'चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान 'बिग बॉस 16'मधील स्पर्धकांसोबत बसलेला दिसत आहे. सलमान खानने अब्दुला त्याला हवे असलेल्या डंबेलची भेट दिली आहे. 

अमृता खानविलकरच्या साडी लूकने पडली चाहत्यांना भुरळ!

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटासाठी प्रचंड चर्चेत आहे. चित्रपट रिलीज होऊन आता अनेक महिने लोटले तरी अद्याप या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. ‘चंद्रा’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. या लूकमध्ये अमृता खूप सुंदर दिसत आहे.


 





Arun Bali Passes Away: ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली काळाच्या पडद्याआड, 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे आज (7 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांनी आपल्या करिअरची सुरुवात 90च्या दशकात केली होती. त्यांनी ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’ आणि ‘पानिपत’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका साकारत प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली होती.


 





Hindustani Bhau Demands To Boycott Goodbye : हिंदुस्तानी भाऊने 'गुडबाय' सिनेमाला बायकॉट करण्याची केली मागणी

Hindustani Bhau Demands To Boycott Goodbye : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या 'गुडबाय' (Goodbye) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. 7 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ आणि रश्मिका 'गुडबाय'चं चांगलचं प्रमोशन करत आहेत. अशातच या सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी होत आहे. 'बिग बॉस' फेम हिंदुस्तानी भाऊने (Hindustani Bhau) एक व्हिडीओ शेअर करत 'गुडबाय' सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी केली आहे. 





Abhishek Bachchan : 'वडिलांना थोडा आदर द्या', म्हणत अभिषेक बच्चनने सोडला शो

Abhishek Bachchan Case To Banta Hai : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) नुकताच 'केस तो बनता है' (Case To Banta Hai) या कार्यक्रमात दिसून आला आहे. 'केस तो बनता है' हा विनोदी कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. पण या कार्यक्रमादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची मस्करी करण्यात आल्याने अभिषेकला राग आला आणि त्याने कार्यक्रमाला रामराम ठोकला. 





Saif Ali Khan: ‘आदिपुरुष’ वादादरम्यान सैफ अली खानचं नवं वक्तव्य चर्चेत; म्हणाला ‘आता मला महाभारतात काम करायचंय!’

सैफ अली खानने नुकतीच ’महाभारता’त काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्याने सांगितले की, 1999मध्ये आलेल्या 'कच्चे धागे' या चित्रपटापासून तो अभिनेता अजय देवगणशी याबद्दल चर्चा करत आहेत. यावेळी त्याने महाभारतातील त्याचे आवडते पात्र कोण आहे, हेही त्यांनी सांगितले.


 





Happy Birthday Sharad Kelkar: चित्रपटच नाहीतर मालिकाही गाजवणारा शरद केळकर, डबिंग क्षेत्रातही करतो काम!

मॉडेलिंग असो, स्टेज शो असो, चित्रपट किंवा मालिकेत अभिनय असो किंवा व्हॉईस ओव्हर असो, प्रत्येक क्षेत्रात शरद केळकरचा मोठा दबदबा आहे. शरद केळकर यांनेच ‘बाहुबली’ला अर्थात प्रभासला आपला दमदार आवाज देऊन ही व्यक्तिरेखा आणखी उत्कृष्ट बनवली होती. असा हा बहुगुणी अभिनेता शरद केळकर आज (7 ऑक्टोबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे.


 





Avadhoot Gupte : मी तुमच्या गटाचा! शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांवर अवधूत गुप्तेने दिलं स्पष्टीकरण

अवधूत पुढे म्हणाला,"माझ्याकडे अद्याप कोणत्याही पक्षाचं साधं प्राथमिक सदस्यत्व पण नाही. तसेच मी कोणत्याही पक्षात किंवा गटात प्रवेश केलेला नाही. तुम्ही माझा प्रेक्षकवर्ग, चाहते, फॉलोअर्स हे माझे मायबाप आहात. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचं स्पष्टीकरण देणं हे मी माझं उत्तरदायित्व समजतो. मी याआधीही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरुन माझी कला सादर केल्याचे तुम्ही जाणताच...माझ्या लेखी हा विषय इथेच संपला!".





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात घुमणार ‘पुष्पा’चा आवाज; खास पाहुणा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!


लवकरच ‘बिग बॉस मराठी सीझन 4’च्या घरात ‘पुष्पा’चा दमदार आवाज घुमणार आहे. अर्थात अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) ‘बिग बॉस मराठी सीझन 4’च्या घरात दमदार एन्ट्री घेणार आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे ‘बिग बॉस मराठी 4’च्या घरात एन्ट्री करताना दिसत आहे. तर, श्रेयस एन्ट्री करतानाच खास पुष्पाच्या आवाजात ‘मै झुकेगा नही साला’ हा प्रसिद्ध डायलॉग म्हणताना दिसत आहे.


सलमान खान अन् चिरंजीवी यांच्या 'गॉडफादर'ची बॉक्स ऑफिसवर जादू; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीचा 'गॉडफादर' (Godfather)  हा चित्रपट काल (5 ऑक्टोबर) प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 'पोन्नियिन सेलवन: 1'आणि  'विक्रम वेधा' या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चिरंजीवी  (Chiranjeevi)  आणि सलमान खान (Salman Khan)  यांच्या  गॉडफादर (GodFather) या चित्रपटानं पहिल्या दिवशी केलेल्या कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात...रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार गॉडफादर या चित्रपटानं जगभरात 38 कोटींची कमाई केली.


'उंच उंच उडू आज, आभाळात फिरू...'; 'पल्याड' चित्रपटाचा टीझर रिलीज


फोर्ब्ससारख्या जागतिक किर्तीच्या मासिकानं दखल घेतलेला, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये मानाचे समजले जाणारे सर्वच पुरस्कार आपल्या नावे करणाऱ्या 'पल्याड' (Palyad) या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. मीडियापासून सोशल मीडियापर्यंत सर्वच ठिकाणी या चित्रपटावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला जात असल्यानं रसिकांनाही हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. हि उत्सुकता आणखी शिगेला पोहोचवणारा 'पल्याड'चा टिझर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा विषय, आशय आणि वातावरणाची झलक दाखवणारा 'पल्याड'चा टिझर सोशल मीडियावर केवळ धुमाकूळ घालत नसून, या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळेल याचा अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. 4 नोव्हेंबर रोजी 'पल्याड' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


विनोदाच्या जगतातील आणखी एक तारा निखळला; कॉमेडियन पराग कंसारा यांचे निधन


टीव्ही विश्वातील लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. या धक्क्यातून लोक सावरलेही नाहीत, तर आता ‘लाफ्टर चॅलेंज’मध्ये झळकलेल्या कॉमेडियन पराग कंसारा (Comedian Parag Kansara) यांचेही आकस्मिक निधन झाले आहे. पराग कंसारा यांच्या निधनानंतर संपूर्ण कॉमेडीविश्व पुन्हा एकदा शोकसागरात बुडाले आहे. कॉमेडियन सुनील पाल यांनी पराग यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.