Entertainment News Live Updates 5 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 05 Feb 2023 05:20 PM
Shark Tank India-2: 10 वी पर्यंत शिक्षण अन् वयाच्या 8 व्या वर्षी झाला उद्योजक; 18 वर्षाच्या तरुणाचा प्रवास ऐकून 'शार्क्स' देखील झाले थक्क!

Shark Tank India-2: छोट्या पडद्यावरील 'शार्क टँक इंडिया-2' (Shark Tank India-2) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीझनला देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. 'शार्क टँक इंडिया' या शोमध्ये स्वत:चा व्यवसाय असणारे लोक येतात. हे लोक शोमधील परीक्षकांना त्यांची बिझनेस आयडिया सांगतात. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये 18 वर्षाच्या एका तरुणानं हजेरी लावली. या तरुणाचा प्रवास ऐकून शोमधील शार्क्स देखील थक्क झाले. 



Tharla Tar Mag : ठरलं तर मग; मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी सायली अर्जुनसोबत करणार कॉण्ट्रॅक्ट मॅरेज!

Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत लवकरच सायली आणि अर्जुनचा लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आता या विवाहसोहळ्याची उत्सुकता लागली आहे. 





Bigg Boss 16: बिग बॉस- 16 च्या ग्रँड फिनालेआधीच सुंबुल झाली आऊट; घराबाहेर गेल्यानंतर व्यक्त केल्या भावना

Bigg Boss 16बिग बॉस-16 चा (Bigg Boss 16) ग्रँड फिनालेला केवळ एक आठवडा राहिला आहे. शनिवार (4 फेब्रुवारी)  सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan) ही घराबाहेर पडली. एका मुलाखतीमध्ये सुंबुलनं तिचा बिग बॉसमधील प्रवास सांगितला. 








 








Chitrashi Rawat Wedding: 'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री वयाच्या 34व्या वर्षी चढली भोवल्यावर; लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल

Chitrashi Rawat Wedding: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'चक दे इंडिया' (Chak De India)  हा चित्रपट 2007 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट रिलीज होऊन 15 वर्ष झाली आहेत. तरी देखील आनेक लोक आजही तो चित्रपट आवडीनं बघतात. या चित्रपटांमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटात 'कोमल चौटाला' ही भूमिका साकारणाऱ्या चित्राशी रावतचा  (Chitrashi Rawat Wedding) विवाह सोहळा पार पडला आहे. चित्राशीनं ध्रुवादित्य भगनानीसोबत (Dhruvaditya Bhagwanani) लग्नगाठ बांधली. गेली काही वर्ष चित्राशी  ध्रुवादित्यला डेट करत होती. आता या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 













 















Rakhi Sawant Adil Khan : राखी सावंतच्या आरोपांवर आदिलने सोडलं मौन

Adil Khan Reaction On Rakhi Sawant : 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या चर्चेत आहे. तिने तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खानवर (Adil Khan) फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तसेच मीडियानेदेखील तिने आदिलला पाठिंबा देऊ नये आणि त्याची मुलाखत घेऊ नये असे सांगितले होते. पण अखेर आदिल खानने आता या प्रकरणावर मौन सोडलं आहे. राखीने केलेल्या आरोपांवर अखेर त्याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 



Pathaan Box Office Collection : शाहरुखचा 'पठाण' 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील!

Shah Rukh Khan Pathaan Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने वर्षाच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसला सुगीचे दिवस दाखवले आहेत. वीकेंड आणि वर्किंग डे कोणत्याही दिवशी बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चाच बोलबाला आहे. रिलीजच्या 11 व्या दिवशीही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 





Kiara Sidharth Wedding Guest : शाहिद-करणपासून ते दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणपर्यंत; सिड-कियाराच्या लग्नसोहळ्यात सेलिब्रिटींची मांदियाळी

Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Guest : बी-टाऊनच्या लोकप्रिय जोड्यांमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा आडवाणीची (Kiara Advani) गणना होते. सिद्धार्थ आणि कियारा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आता त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून त्यांच्या लग्नसोहळ्याला शाहिद-करणपासून ते दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणपर्यंत अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नसोहळ्यात हजेरी लावणार आहेत. 





Kartik Aaryan Kriti Sanon : कार्तिक आर्यन क्रिती सेननसोबत पोहोचला ताजमहालात

Kartik Aaryan Kriti Sanon At Tajmahal : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) सध्या त्यांच्या आगामी 'शेहजादा' (Shehzada) सिनेमामुळे चर्चेत आहेत. सध्या या सिनेमाचं ते जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतचं सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान कार्तिकने क्रितीसोबत आग्राच्या ताजमहालाला भेट दिली आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. 





Urvashi Dholakia Car Accident : 'बिग बॉस' फेम उर्वशी ढोलकियाच्या कारला स्कूल बसची धडक

Urvashi Dholakia Car Accident : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये उर्वशी ढोलकियाचं (Urvashi Dholakia) नाव घेतलं जातं. उर्वशी नुकतीच एका अपघातातून थोडक्यात बचावली आहे. उर्वशीच्या कारला स्कूल बसने धडक दिली आहे. या अपघातात अभिनेत्रीला गंभीर दुखापत झालेली नाही. उर्वशी ढोलकिया ही 'बिग बॉस 6'ची (Bigg Boss 6) विजेती आहे. 





Happy Birthday Abhishek Bachchan: अभिषेक बच्चनने कसं केलं ऐश्वर्या रायला प्रपोज

Abhishek Bachchan Birthday : अभिषेकने खूपच फिल्मी पद्धतीत ऐश्वर्याला प्रपोज केलं आहे. 2007 साली एका सिनेमाच्या शूटिंगसाठी अभिषेक आणि ऐश्वर्या न्यूयॉर्कला गेले होते. त्यावेळी अभिषेकने ऐश्वर्याला कसं प्रपोज करायचं याचा खूप विचार केला. अखेर न्यूयॉर्कमधील हॉटेलच्या बाल्कनीत त्याने फिल्मी पद्धतीत ऐश्वर्याला प्रपोज केलं. ऐश्वर्यालादेखील अभिषेक आवडत असल्याने तिने लगेचच होकार दिला. अखेर 20 एप्रिल 2007 साली अभिषेक आणि ऐश्वर्या लग्नबंधनात अडकले. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Thalapathy vijay: थलापती विजयच्या आगामी चित्रपटाचं नाव माहितीये?


Thalapathy vijay: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजयचा (Thalapathy vijay) बहुचर्चित आगामी चित्रपट ज्याचे तात्पुरते टायटल 'थलापथी 67' (Thalapathy 67) असे ठेवण्यात आले होते, याचे ऑफिशल टायटल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अशातच, प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेत, निर्मात्यांनी अखेरीस या चित्रपटाचे टायटल 'लिओ' (Leo) आहे असे जाहीर केले आहे.


Baburaj: फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेता बाबूराजला अटक


Baburaj:  मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता बाबूराजला (Baburaj) आज (शनिवार) पोलिसांनी फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली आहे. इडुक्की (Idukki) जिल्ह्यातील अदिमाली पोलीस स्टेशनमध्ये (Adimali Police Station) बाबूराजच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बाबूराजला अटक करण्यात आली. 


Manipur: इंफाळमधील फॅशन शोच्या ठिकाणाजवळ स्फोट, सनी लिओनी लावणार होती हजेरी


Manipur: मणिपूरमधील (Manipur) इंफाळ (Imphal) येथे आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोच्या ठिकाणाजवळ आज (शनिवारी) सकाळी स्फोट झाला. या शोमध्ये अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हजेरी लावणार होती. मणिपूरची राजधानी इंफाळ येथील हट्टा कांगजेबुंग भागात ही घटना घडली आहे.  इंफाळ येथे आयोजित   फॅशन शोच्या ठिकाणापासून जवळपास 100 मीटर अंतरावर हा स्फोट झाला, असं म्हटलं जात आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. 


Paach Futacha Bacchan: सुपरस्टार तिथं पण असतात आणि इथं पण...; पुण्यात रंगणार 'पाच फुटाचा बच्चन' च्या शुभारंभाचा प्रयोग


Paach Futacha Bacchan: कोरोना काळानंतर मराठी रंगभूमी थंडावली होती. पण आता नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 5 फेब्रुवारी 2023 रोजी आणखी एक नवे नाटक मराठी रंगभूमीवर येते आहे. रोम रोम रंगमंच आणि ऑर्फियस स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाच फुटाचा बच्चन’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग यशवंतराव चव्हाण नाट्यसभागृहात 5 फेब्रुवारीला रविवारी रात्री 9 वाजता पार पडणार आहे. ऑर्फियस स्टुडिओच्या माध्यमातून फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि जाहिरात क्षेत्रात सर्जक काम करणाऱ्या मूळच्या कोल्हापूरच्या कौस्तुभ रमेश देशपांडेने हे नाटक लिहिले आहेत तसेच श्रुती मधुदीपनं हे नाटक दिग्दर्शित केले आहे.  श्रुती मधुदीप या नाटकामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.