Entertainment News Live Updates 31 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'शेर शिवराज' (Sher Shivraj) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
तेलगू अभिनेत्री मैथिलीने (Maithili) आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. 8 कॅन ब्रीझर्स आणि झोपेच्या गोळ्या घेत मैथिलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस मैथिलीच्या घरी पोहोचले आणि तिचे प्राण वाचवले आहेत. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. सध्या मनोरंजनसृष्टीतून अनेक आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. गेल्या 15 दिवसांत चार अभिनेत्रींनी आयुष्य संपवलं आहे.
Satyavan Savitri : 'सत्यवान सावित्री' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी सावित्रीचे पात्र साकारणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 12 जून पासून ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ब्रम्हास्त्रचा जबरदस्त टीझर रिलीज; पाहा रणबीर, आलिया, बिग बी अन् नागार्जुन यांची झलक
पाहा टीजर
दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा (Yash) 'केजीएफ 2' (KGF 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सिनेमाच्या हिंदी वर्जनने 400 कोटींचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात या सिनेमाने 1000 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. 3 जूनला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि अल्लू अर्जुन (Allu Arjun) आता पॅन इंडियाचे स्टार झाले आहेत. 'पुष्पा' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे प्रेक्षक 'पुष्पा 2' सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. सध्या 'बाहुबली' फेम प्रभास (Prabhas) सालार (Salaar) सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रशांत नील (Prashanth Neel) या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. प्रशांत नीलचा 'केजीएफ 2' (KGF 2) सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. अशातच 'पुष्पा 2' आणि 'सालार' बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार असल्याचे म्हटले जात आहे.
Juda Hoke Bhi : विक्रम भट्टचा आगामी 'जुदा होके भी' हा सिनेमा 15 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे मोशन मोस्टर आऊट झाले आहे.
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सध्या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. परी नेहाची मुलगी असल्याचे सत्य अखेर देशपांडे सरांसमोर आले आहे. यश-नेहाने ही गोष्ट आजोबांपासून लपवून ठेवल्याने आजोबांना प्रचंड राग आला आहे. त्यामुळे आता यश नेहाच्या चाळीत राहायला जाणार आहे.
प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली असून येत्या 22 जुलै रोजी ‘अनन्या’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटाचे टीझरही झळकले आहे. सायकलवर स्वार होत, आभाळात उत्तुंग भरारी घेणारी, आभाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारी एक आगळीवेगळी ‘अनन्या’ (Ananya) दिसत आहे. यात हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ‘अनन्या’ ही व्यक्तिरेखा साकारत असून तिची जिद्द आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता यात पाहायला मिळणार आहे.
Timepass 3 : हम गरीब हुए तो क्या हुआ ! चला, हवा येऊ द्या ! नया है वह! आई बाबा आणि साईबाबाची शपथ यासारख्या हिट संवादांनी नटलेला, दगडू - प्राजू, कोंबडा, मलेरिया, बालभारती, शाकाल उर्फ माधव लेले अशा अतरंगी पात्रांनी सजलेला आणि मला वेड लागले प्रेमाचे, फुलपाखरू, ही पोली साजूक तुपातली सारख्या गाण्यांनी धमाल उडवून देणारा चित्रपट म्हणजे टाइमपास ! झी स्टुडिओजची निर्मिती आणि रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने सजलेले टाइमपास आणि टाइमपास 2 (Timepass 2) हे दोन्ही चित्रपट कमालीचे लोकप्रिय ठरले. टाइमपासमध्ये अधुऱ्या राहिलेल्या प्रेमाची गोष्ट टाइमपास 2 मध्ये पूर्ण झाली. आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Haunted House : रोड आयलँडमधील हॉन्टेड हाऊस (Haunted House ) विकले गेले आहे. या घरावर त्या चित्रपटाचे कथानक आधारित आहे, असं म्हटलं जातं. या घराच्या मालकानं हे घर 1.5 मिलियन डॉलरला म्हणजेच जवळपास 11,63,65,125 रुपयांना विकले आहे.
नुसरत भरुचा आणि अनुद सिंह ढाका हे सध्या त्यांच्या ‘जनहित में जारी’ या आगामी चित्रपटचे प्रमोशन करत आहेत. प्रमोशन दरम्यान त्यांनी एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांनी जयपूरमध्ये 6000 महिलांसोबत घूमार हा डान्स करुन वर्ल्ड रेकॉर्ड केला.
पैसे किंवा सोन्याचे दागिने हे निट सांभाळून ठेवणं गरजेचे असते. चोरी केलेले पैसे किंवा हरवलेले सोन्याचे दागिने हे अनेक वेळा परत मिळत नाहीत. पण अभिनेत्री काम्या पंजाबीला (Kamya Punjabi) मात्र तिचे विसरलेले पैसे परत मिळाले आहेत. काम्या ही एका पाणीपुरी स्टॉलवर एक लाख रुपये विसरली होती. पण हे पैसे तिला पुन्हा सापडले. जाणून घेऊयात या घटनेबाबत...
पार्श्वभूमी
'भूल भुलैया 2'ची उत्तुंग भरारी; दुसऱ्या विकेंडलाही कमवला कोट्यवधींचा गल्ला
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर रिलीजच्या दुसऱ्या विकेंडला या सिनेमाने 30 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
आमिर खानचा 'मास्टरपीस' लाल सिंह चड्ढाचा ट्रेलर प्रदर्शित
Laal Singh Chaddha Trailer : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानचा (Amir Khan) आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात आमिर खान एका पंजाबी सरदारच्या भूमिकेत दिसत आहे. आमिरसोबत करीना कपूरदेखील (Kareena Kapoor) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमात लाल सिंह चड्ढा नावाच्या व्यक्तीचा जीवनप्रवास दाखवला आहे. या सिनेमात आमिरने अनेक भूमिका साकारल्याचे ट्रेलरवरून दिसते आहे. ट्रेलरच्या शेवटी आमिर पळताना दिसतो आहे. आमिर का पळतोय हे प्रेक्षकांना सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेल.
'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल टी-20 च्या अंतिम सामन्यात या सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. ट्रेलर लॉंचच्या कार्यक्रमादरम्यान सिनेमातील आमिर खानसह सिनेमातील अनेक कलाकार स्टेडियममध्ये उपस्थित होते.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आयपीएल 2022 च्या फायनलचा थरार सुरू आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यामध्ये अटीतटीची लढत सुरू आहे. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावाच्या दुसऱ्या टाइन आऊटवेळी आमिर खान याच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -