Entertainment News Live Updates 28 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jun 2022 06:20 PM
Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2'ने जगभरात केली 230 कोटींची कमाई

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा सिनेमा 20 मे रोजी सिनेमागृहात रिलीज झाला असून आजही या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच दबदबा पाहायला मिळत आहे. या सिनेमाने जगभरात 230 कोटींची कमाई केली आहे. 





अॅमेझॉन प्राईमने शेअर केला 'Modern Love Hyderabad' चा ट्रेलर

'Modern Love Hyderabad' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. 





"तुमच्या प्रेमाने आम्ही भारावलो आहोत"... आलियाने मानले चाहत्यांचे आभार

आलियाने खास पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"तुमच्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत. प्रत्येक चाहत्याचा मेसेज वाचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तुमचे प्रेम आणि आर्शीवाद असेच राहुदेत. आमच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होत आहे. सर्वांचे आभार...". 




 


अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर येतोय सिनेमा

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजयेपी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव 'मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल' (Main Rahoon Ya Na Rahoon Yeh Desh Rehna Chahiye - Atal) असे आहे. मंगळवारी निर्मात्यांनी या सिनेमाची घोषणा करत मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 





Prarthana Behere : प्रार्थनाचा ग्लॅमरस लूक; शेअर केले खास फोटो

Phone Bhoot : कतरिना, ईशान अन् सिद्धांत यांच्या 'फोन भूत' ची रिलीज डेट जाहीर

कतरिना, ईशान आणि सिद्धांत यांच्या 'फोन भूत' ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.  हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 





मल्याळम अभिनेत्री अंबिका राव यांचे निधन

Ambika Rao : मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अंबिका राव (Ambika Rao) यांचे सोमवारी (27 जून) निधन झाले. रिपोर्टनुसार, ह्रदयविकाराच्या झटक्यानं त्यांचे निधन झाले. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  सोमवारी सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर एर्नाकुलम येथील एका खाजगी रुग्णायलात त्यांना दाखल करण्यात आलं. पण रात्री 10.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  रिपोर्टनुसार, अंबिका राव यांना कोरोनाची लागण देखील झाली होती आणि त्यांच्यावर उपचार सुरु होते. ‘कुम्बालांगी नाइट्स’या चित्रपटामधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. 


वाचा सविस्तर बातमी

FIR Against Ram Gopal Varma : ट्वीट करणं भोवलं; राम गोपाल वर्माच्या विरोधात FIR दाखल

FIR Against Ram Gopal Varma : सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा  (Ram Gopal Verma) हा नेहमी चर्चेत असतो. ट्विटरवर अॅक्टिव्ह असणारा   राम गोपाल वर्मा हा वेगवेगळ्या विषयांवरील ट्वीट शेअर करत असतो. पण हेच ट्वीट करणं आता राम गोपाल वर्माला भोवलं आहे. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी राम गोपाल वर्माच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हजरतगंज कोतवाली येथे आयटी कायद्यासह विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


वाचा सविस्तर बातमी

सोशल मीडिया 'वॉर' नंतरची शरद पोंक्षे आणि आदेश बांदेकरांची प्रतिक्रिया

Sharad Ponkshe, Aadesh Bandekar : महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचे पडसाद मनोरंज क्षेत्रावर उमटत आहेत. सध्या अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) आणि आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्यामध्ये सुरु असलेल्या सोशल मीडियावरील वॉरची चर्चा सुरु आहे. आता या सोशल मीडियावरील वॉरवर शरद पोंक्षे आणि आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

Dharmaveer : 'धर्मवीर' मधील डायलॉगवर कात्री; 'शिवसेनेनं डायलॉग काढायला लावला', अमेय खोपकरांचा आरोप

Dharmaveer : आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित असणारा 'धर्मवीर' (Dharmaveer) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटामधील एक व्हिडीओ शेअर करुन मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी एक शिवसेनेवर आरोप केले आहेत. या चित्रपटामधील एक डायलॉग काढून हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे, असं अमेय खोपकर यांचे मत आहे. 


पाहा व्हिडीओ:



Dharmaveer : 'धर्मवीर' मधील डायलॉगवर कात्री; 'शिवसेनेनं डायलॉग काढायला लावला', अमेय खोपकरांचा आरोप

Dharmaveer : आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित असणारा 'धर्मवीर' (Dharmaveer) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटामधील एक व्हिडीओ शेअर करुन मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी एक शिवसेनेवर आरोप केले आहेत. या चित्रपटामधील एक डायलॉग काढून हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे, असं अमेय खोपकर यांचे मत आहे. 


पाहा व्हिडीओ:



जगण्याची नवी दिशा देणाऱ्या 'अनन्या'चा ट्रेलर प्रदर्शित

पाहा ट्रेलर :


बॉक्स ऑफिसवर ‘जुग जुग जीयो’चा धुमाकूळ

Jug Jugg Jeeyo Box Ofice Collection :  जुग जुग जियो (Jug Jug Jeeyo)  हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर (Anil Kapoor), नीतू कपूर (Neetu Kapoor), कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांनी प्रमुख भूमिका साकारली. जुग जुग जियो या चित्रपटाचं प्रेक्षक आणि क्रिटिक्स हे दोघेही कौतुक करत आहेत. रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटानं  9.28 कोटींची कमाई केली. रिलीज झाल्यानंतर तीन दिवसात या चित्रपटानं  60.84 कोटींची कमाई जगभरातील बॉक्स ऑफिसवर केली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

नीतू कपूर यांनी शेअर केला खास फोटो

नीतू कपूर यांनी रणबीर आणि आलियाचा फोटो पोस्ट केला आहे.





DID Super Moms : डीआयडी सुपर मॉम्सच्या मंचावर थिरकली 76 वर्षाची आजी

DID Super Moms : डीआयडी सुपर मॉम्स (DID Super Moms) हा शो 2 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री  उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar),भाग्यश्री (Bhagyashree)  आणि रेमो डिसूजा (Remo D'Souza) हे या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. सध्या या कार्यक्रमाचे ऑडिशन्स सुरु आहे. नुकताच सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये 76 वर्षाची लक्ष्मी आजी ही  डीआयडी सुपर मॉम्सच्या मंचावर थिरकताना दिसत आहे.  


पाहा व्हिडीओ:





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


अरिजित सिंहच्या आवाजाची जादू, 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील बहुप्रतीक्षित गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!


Phir Na Aisi Raat Aayegi Song Out : 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे बहुप्रतीक्षित गाणे अखेर आज (25 जून) प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर ते आतापर्यंतचे सर्वात भावपूर्ण संगीत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रीतमने संगीतबद्ध केलेले हे गाणे गायक अरिजित सिंहने गायले आहे. नुकताच अभिनेता आमिर खानने सोशल मीडियावर अभिनेत्री करीना कपूर-खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये करीना या चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे गाणे दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे असल्याचे, तिने म्हटले आहे.


Shahu Chhatrapati : लोकराजाची कथा 'शाहू छत्रपती'... राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर येणार भव्य मराठी सिनेमा; पोस्टर आऊट


गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरत आहेत. 


DID Super Moms : डीआयडी सुपर मॉम्सच्या मंचावर थिरकली 76 वर्षाची आजी; डान्स पाहून परीक्षक झाले थक्क


DID Super Moms : डीआयडी सुपर मॉम्स (DID Super Moms) हा शो 2 जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री  उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar),भाग्यश्री (Bhagyashree)  आणि रेमो डिसूजा (Remo D'Souza) हे या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. सध्या या कार्यक्रमाचे ऑडिशन्स सुरु आहे. नुकताच सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये 76 वर्षाची लक्ष्मी आजी ही  डीआयडी सुपर मॉम्सच्या मंचावर थिरकताना दिसत आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.