Entertainment News Live Updates 28 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 28 Feb 2023 05:24 PM
Chiranjeevi - Nagarjuna : अभिनेते चिरंजीवी आणि नागार्जुन यांनी घेतली अनुराग ठाकूर यांची भेट; 'या' विषयांवर केली चर्चा

Chiranjeevi-Nagarjuna Anuraj Thakur Pics : भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ( BJP MP Anurag Thakur) हे काही दिवसांपूर्वी हैद्राबाद (Hyderabad) येथे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान  अनुराग ठाकूर यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चिरंजावी (Chiranjeevi) आणि नागार्जुन (Nagarjuna) यांची भेट घेतली. चिरंजावी यांनी अनुराग ठाकूर आणि नागार्जुन यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले. 



Ponniyin Selvan 2 trailer : प्रतीक्षा संपली! पोन्नियिन सेल्वन 2 चा ट्रेलर होणार रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Ponniyin Selvan 2 Trailer:  दिग्दर्शक  मणिरत्नम (Mani Ratnam)   यांचा पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. पोन्नियिन सेल्वन चित्रपटाच्या यशानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग लकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  पोन्नियिन सेल्वन -2 (Ponniyin Selvan 2)  ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याआधी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आणि ऑडिओ लाँच कार्यक्रम होणार आहे. या चित्रपटामध्ये काय बघायला मिळणार आहे? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. 

Satarcha Salman : 'सातारचा सलमान'मध्ये यासाठी गावाला दिला रंग

Satarcha Salman Movie : 'सातारचा सलमान' (Satarcha Salman) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाच्य शूटिंगसाठी साताऱ्यातील (Satara) केंजळ हे गाव खास रंगीबेरंगी करण्यात आले आहे. 'सातारचा सलमान' या सिनेमाचं शूटिंग साताऱ्यातील केंजळ गावात झालं आहे. 

Gumraah : मृणाल ठाकुरच्या 'गुमराह'चा टीझर उद्या येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Gumraah : मृणाल ठाकुरच्या 'गुमराह'चा टीझर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 



Ushna Shah Wedding : पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहा भारतीय नववधूच्या रुपात

Pakistani Actress Ushna Shah Troll : पाकिस्तानी अभिनेत्री उस्ना शहा (Ushna Shah) नुकतीच हमजा अमीनसोबत (Hanza Amin) लग्नबंधनात अडकली आहे. नवविवाहित जोडप्याचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये भारतीय नववधूच्या लूकमध्ये उस्ना दिसत आहे. पाकिस्तानी अभिनेत्रीने लग्नसोहळ्यात भारतीय नववधूचा लूक केल्याने तिला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. 

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'चा विजेता MC Stan लवकरच लग्नबंधनात अडकणार

Bigg Boss 16 Winner MC Stan Wedding : 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) विजेता, रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) सध्या चर्चेत आहे. हटके पर्सनॅलिटी आणि बोलण्याच्या अनोख्या स्टाइलमुळे चर्चेत असणारा स्टॅन आता गर्लफ्रेंड बूबामुळे (Buba) चर्चेत आला आहे. एमसी स्टॅनने नुकतच एका मुलाखतीत जाहीर केलं आहे की तो लवकरच बूबासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे आता बूबा कोण आहे? काय करते? तिचं खरं नाव काय आहे? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. एमसी स्टॅन त्याच्या गर्लफ्रेंडला 'बूबा' या नावाने हाक मारत असला तरी तिचं खरं नाव अनम शेख आहे.

Prajakta Mali : प्राजक्ता माळी बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुखला 17 वेळा धडकली

Prajakta Mali On Shah Rukh Khan : 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सहभागी झाली असून तिने तिच्या आयुष्यातील विविध गोष्टींबद्दल भाष्य केलं आहे. दरम्यान तिने 'स्वदेस' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. प्राजक्ता बॉलिवूडचा बादशाह असेलल्या शाहरुख खानला (Shah Rukh Khan) 17 वेळा धडकली आहे. 





BTS J-Hope : Jin नंतर आता बीटीएसचा दुसरा सदस्य होणार सैन्यात भरती, J-Hope नं चाहत्यांना दिली मोठी बातमी

J-Hope : बीटीएस (BTS) (Bangtan Sonyeondan) या जगप्रसिद्ध कोरियन ब्रॅंडचा (Korean Brand)  सदस्य जे - होप (J-Hope) सैन्यात भरती होणार आहे. लाईव्ह सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. लाईव्ह सेशनदरम्यान तो म्हणाला की,"मला माझा सहकारी जिनने सैन्यात भरती होण्याचा सल्ला दिला होता. आता लवकरच मी चाहत्यांसाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. 





Citadel : प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल'चा फर्स्ट लुक आऊट

Priyanka Chopra Citadel First Look : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने (Priyanka Chpra) तिच्या आगामी 'सिटाडेल' (Citadel) या वेबसीरिजची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या सीरिजमध्ये देसी गर्ल एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 28 एप्रिलला या वेबसीरिजच्या पहिल्या दोन भागांचा प्रीमियर होणार आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Zee Cine अवॉर्ड्स सोहळ्यात 'द कश्मीर फाइल्स' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट


Zee Cine Awards 2023 : विवेक अग्निहोत्री यांच्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाला गेल्या वर्षी जगभरातून प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. हा चित्रपट रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झालं तरीही चित्रपटाची उत्कृष्ट फिल्मोग्राफी आणि पात्रांच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाला एका सामाजिक संस्थेकडून सन्मानित करण्यात आलं. यावेळी पुन्हा, 'द कश्मीर फाइल्स' ने झी सिने अवॉर्ड्स 2023 (Zee Cine Awards 2023) मध्ये चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 'सर्वोत्कृष्ट चित्रपट', 'सर्वोत्कृष्ट पटकथा', 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' आणि 'नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता' पुरस्कार जिंकले आहेत. 


शिजान खानच्या जामिनावर 2 मार्चला होणार सुनावणी


Sheezan Khan: अभिनेत्री  तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शिजान खानला (Sheezan Khan) आजही जामीन मिळाला नाही. वसई सत्र न्यायालयाने सुनावणीची पुढील तारीख 2 मार्च ही दिली आहे. शिजानच्या वकिलांनी दिनांक 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आज (27 फेब्रुवारी) शिजानचे वकिल शैलेंद्र मिश्रा यांनी न्यायालयात युक्तिवादाच्या वेळी आपला अशिल मुस्लिम असल्यामुळे त्याला जामीन मिळत नसल्याचा युक्तिवाद केला. याला सरकारी वकिल संजय मोरे आणि तुनिषाचे वकिल तरुण शर्मा प्रत्युत्तर दिलं. 


‘महाराष्ट्र शाहीर’ मधील 'बहरला हा मधुमास...' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस


Baharla Ha Madhumas:  ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज (27  फेब्रुवारी) ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा...’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अनेक वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट  रिलीज आधीच चर्चेत आहे. मराठी भाषादिनी प्रदर्शित झालेले 'बहरला हा मधुमास...’ हे गाणे असेच एक वैशिष्ट्य अधोरेखित करणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.