Entertainment News Live Updates 26 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Avatar: The Way of Water : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar: The Way of Water) या बहुचर्चित हॉलिवूड सिनेमाची सिनेरसिक गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे.
Vikram Gokhale health updte : विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असून आता त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली होती. पण आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आहे.
Oh Yeong Su : 'स्क्विड गेम' (Squid Game) या वेब सीरिजने जगभरात धुमाकूळ घातला. या वेबसीरिजमध्ये ओ येओंग सु (O Yeong Su) एका वृद्ध व्यक्तीच्या भूमिकेत होते. गेल्या काही दिवसांपासून लैंगिक छळाच्या आरोपामुळे ते चर्चेत होते. पण आता त्यांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Vivek Agnihotri On Richa Chadha : विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट केलं आहे,"रिचाच्या ट्वीटचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. कारण तिच्या मनात जे होतं ते तिने लिहिलं आहे. ती भारतविरोधी आहे हे तिच्या ट्वीटवरुन जाणवतं. पण तरी ही मंडळी बॉलिवूडवर बहिष्कार का घालता असा प्रश्न उपस्थित करतात".
Bhalji Pendharkar : भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar) यांनी पाच दशकाहून अधिक काळ सिने-दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक म्हणून सिनेसृष्टीत काम केलं आहे. मूकपट ते बोलपट आणि कृष्णधवल ते रंगीत सिनेनिर्मिती करण्यात भालजी पेंढारकर यांचा मोलाचा वाटा होता. 26 नोव्हेंबर 1994 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.
Bhalji Pendharkar Death Anniversary : मूकपट ते बोलपट आणि कृष्णधवल ते रंगीत सिनेनिर्मितीत मोलाचा वाटा असणारे भालजी पेंढारकर; जाणून घ्या त्यांची कारकीर्द
Kris Wu Sentenced To Jail For Rape : चीनी-कॅनडियन पॉपस्टार क्रिस वूला (Kris Wu) सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी चीनच्या न्यायालयाने बलात्कार प्रकरणी क्रिसला 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेने त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Arjun Rampal : 'प्यार इश्क और मोहब्बत' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अर्जुन रामपाल आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Prashant Damle : प्रशांत दामले, आरती अंकलीकर टिकेकर आणि मीना नाईक यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर
Prashant Damle : संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा आज (शुक्रवारी) करण्यात आली. यामध्ये 2019, 2020 आणि 2021 असे तीन वर्षांचे पुरस्कार एकत्रित जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मराठी रंगभूमीवरील चिरतरूण अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक प्रशांत दामले (Prashant Damle) यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतेच प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे 12 हजार 500 प्रयोग पूर्ण झाले. असा विक्रमी प्रयोग पार पाडणारे ते एकमेव कलाकार आहेत. त्यांच्या या मेहनतीची दखल घेत त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून प्रशांत दामले यांना 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे.
Ram Kapoor : राम कपूरने खरेदी केली 'Ferrari Portofino' कार
Ram Kapoor : छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता राम कपूर (Ram Kapoor) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'बडे अच्छे लगते हो' ते 'कसम से' पर्यंतच्या टीव्ही मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. राम कपूरने केवळ टीव्ही इंडस्ट्रीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. राम कपूर हा फक्त अभिनयासाठीच नाही तर त्याच्याजवळ असलेल्या वाहनांबद्दलच्या विशेष प्रेमामुळेही चर्चेत राहतो. नुकतीच राम कपूरने त्याची ड्रीम कार खरेदी केली आहे. राम कपूरला महागड्या कारमध्ये फिरायला आवडते. आणि त्याची ही आवड जपण्यासाठी तो प्रचंड मेहनतही करतो. नुकतीच राम कपूरने 3.50 कोटींची फेरारी कार (Ferrari Car) खरेदी केली आहे. फेरारीने अलीकडेच मॉडेल 3 लाँच केले आहे. त्यापैकी राम कपूरने फेरारी पोर्टोफिनो (Ferrari Portofino) खरेदी केली आहे. राम कपूरने त्याची ड्रीम कार खरेदी करण्यासाठी आधीच ही कार बुक केली होती. सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फेरारीच्या नवीन मॉडेलच्या बॅनरवर राम कपूर आणि कुटुंबाचे अभिनंदन लिहिलेले दिसत आहे. या फोटोत राम कपूर आणि त्याची पत्नी गाडीच्या सीटवर बसलेले दिसत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -