Entertainment News Live Updates 15 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 15 Oct 2022 02:08 PM
बाळाला स्तनपान करता करता सोनमनं केली करवा चौथची तयारी; हृदयस्पर्शी व्हिडीओ होतोय व्हायरल

दरम्यान, नुकत्याच आई झालेल्या सोनम कपूरने लग्नाच्या चार वर्षानंतर करवा चौथच्या व्रताबद्दल खुलासा केला आहे. सोनमने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना सांगितले की, "परंपरेनुसार मी करवा चौथचा उपवास करीत नाही. याचं कारण तिचा  पती आनंदला उपवास आवडत नसल्याने ती ठेवत नाही. पण, भारतीय सण आणि सणाचा आनंद घ्यायला दोघांना खूप आवडतं." सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनम करवा चौथसाठी तयार होण्याबरोबरच तिचा मुलगा वायूला स्तनपान (BreastFeeding) करतेय.


 





Dhumshaan Ghala Re: मराठी चित्रपटात मालवणी भाषेतील गाणं; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचं धमाल नृत्य!

एका अनोख्या कथेवर आधारित आणि आगळंवेगळं नाव असलेला 'प्रेमप्रथा धुमशान' हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातलं ‘धुमशान घाला रे’ हे धमाल मालवणी गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, येत्या 28 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


 


Tiger 3 Release Date: अखेर मुहूर्त सापडला! सलमान-कतरिनाचा ‘टायगर 3’ची रिलीज डेट जाहीर

सलमान आणि कतरिनाचा 'एक था टायगर' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यानंतर 'टायगर जिंदा है' हा चित्रपटाचा दुसरा भाग देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच ‘टायगर 3’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. सोबतच चित्रपटाचे नवे पोस्टरदेखील प्रदर्शित कण्यात आले आहे.


 





अनपेक्षित अन् धक्कादायक! चौधरी कुटुंबावर कोसळणार मोठं संकट; नेहा-यशची रेशीमगाठ कायमची तुटणार?

सगळं काही सुरळीत सुरु असताना आता चौधरी कुटुंबावर मोठं संकट कोसळणार आहे. या संकटामुळे चौधरी कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. मालिकेतील या अनपेक्षित वळणामुळे चाहते देखील स्तब्ध झाले आहेत. मालिकेत आता नेहा आणि यशचा मोठा अपघात होणार आहे. केवळ नेहा आणि यशच नाही तर, घरी मिथिलावर देखील एक मोठं संकट कोसळणार आहे.


 





‘कांतारा’चा IMDbवर धुमाकूळ! धनुष अन् प्रभासने कौतुक केलेल्या चित्रपटाची आयएमडीबी रेटिंग पाहिलीत का?

कन्नड भाषेतील चित्रपट ‘कांतारा’ सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. आता हा चित्रपट IMDb वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने IMDb वर 9.5 रेटिंग मिळवून विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम ‘KGF 2’च्या नावावर होता.


 





Happy Birthday Urfi Javed : उर्फी जावेदचा 25वा वाढदिवस! हटके फॅशन स्टाईलमुळे नेहमीच राहिलीये चर्चेत

मॉडेल-अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. हटके फॅशन आणि विचित्र कपड्यांमुळे ती नेहमीच प्रसिद्धी झोतात असते. उर्फीने प्रत्येक वेळी तिच्या फॅशन सेन्सने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. तिच्या विचित्र कपड्यांमुळे तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. फॅशनशिवाय इतर विषयांमुळेही उर्फी जावेद अनेकवेळा वादाचा भाग ठरली आहे. उर्फी आज तिचा 25वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावरही उर्फीचा जलवा पाहायला मिळतो. उर्फीचा जन्म लखनौमध्ये झाला. 


 





Photo : ‘कैसे कहे के आप कितनी खूबसूरत है…’; प्रार्थना बेहेरेच्या साडी लूकवर फिदा झाले चाहते!

मराठी मालिका आणि चित्रपटविश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेतील नेहा या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.अभिनेत्री प्रार्थना बेहरे आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करते.


 





सुप्रीम कोर्टानं एकता कपूरला झापलं; म्हटलं, 'तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात'

'तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात' असं म्हणत सुप्रीम कोर्टानं एकता कपूरला (Ekta Kapoor)झापलं आहे. 'ट्रीपल एक्स'सिरीजमधील आक्षेपार्ह सीन्समुळे सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत.   ‘ट्रिपल एक्स’ या वेबसिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्माती एकता कपूरला फटकारले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म 'अल्ट बालाजी' वर प्रसारित झालेल्या वेब सीरिजमध्ये सैनिकांचा अपमान केल्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली जारी केलेल्या अटक वॉरंटला आव्हान देणाऱ्या एकता कपूरच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली.  


वाचा संपूर्ण बातमी

‘3 इडियट्स’मधील छोट्याशा भूमिकेने बदललं अली फजलच नशीब; ‘मिर्झापूर’मुळे रातोरात झाला स्टार!

बॉलिवूड अभिनेता अली फजल (Ali Fazal) याने प्रतिभेच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्याने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. अलीने बॉलिवूड व्यतिरिक्त अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु, अलीला ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमधील ‘गुड्डू पंडित’च्या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी अली फजल त्याचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याने आमिर खान, माधवन आणि शरमन जोशी अभिनित ‘3 इडियट्स’या चित्रपटातही छोटीशी भूमिका केली होती.


 





कुठे आणि कधी पाहता येणार ‘मिसमॅच 2’, जाणून घ्या...

‘मिसमॅच सीझन 2’ सध्या Netflix वर रिलीज करण्यात आला आहे. ‘मिसमॅच सीझन 2’ (Mismatched Season 2) 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता रिलीज झाला आहे. संपूर्ण सीझन नेटफ्लिक्स स्ट्रीमिंगवर उपलब्ध आहे. नेटफ्लिक्स वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार केव्हाही या सीरिजचा आनंद घेऊ शकतात.


 


‘हॅरी पॉटर’च्या जादुई विश्वातील तारा निखळला! ‘हॅग्रिड’ फेम अभिनेते रॉबी कोलट्रन यांचे निधन

हॉलिवूड चित्रपट सीरिज 'हॅरी पॉटर'मध्ये (Harry Potter) हॅग्रिडची (Hagrid) भूमिका साकारणारे प्रसिद्ध स्कॉटिश अभिनेते रॉबी कोलट्रन (Robbie Coltrane) यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'हॅरी पॉटर' व्यतिरिक्त, ते ITV चा सस्पेन्स शो 'क्रॅकर' आणि जेम्स बाँड चित्रपट 'गोल्डनी' आणि 'द वर्ल्ड इज नॉट इनफ' मध्ये देखील झळकले होते.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


सुप्रीम कोर्टानं एकता कपूरला झापलं; म्हटलं, 'तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात'


'तुम्ही देशातल्या तरुणाईची मानसिकता दूषित करत आहात' असं म्हणत सुप्रीम कोर्टानं एकता कपूरला (Ekta Kapoor)झापलं आहे. 'ट्रीपल एक्स'सिरीजमधील आक्षेपार्ह सीन्समुळे सुप्रीम कोर्टाने खडे बोल सुनावले आहेत.   ‘ट्रिपल एक्स’ या वेबसिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी निर्माती एकता कपूरला फटकारले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म 'अल्ट बालाजी' वर प्रसारित झालेल्या वेब सीरिजमध्ये सैनिकांचा अपमान केल्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली जारी केलेल्या अटक वॉरंटला आव्हान देणाऱ्या एकता कपूरच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली. 


जान्हवी कपूरच्या 'मिली' चित्रपटाचं पोस्टर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरच्या (Janhvi Kapoor)  आगामी चित्रपटांची वाट तिचे चाहते उत्सुकतेने बघत असतात. तिच्या मिली या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरमधील जान्हवीच्या भूमिकेनं अनेकांचे लक्ष वेधले. तिच्या  'मिली' या थ्रिलर चित्रपटचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. जान्हवीची या चित्रपटात भूमिका कोणती आहे? तिच्यासोबत या चित्रपटात कोणते सेलिब्रिटी काम करणार आहेत? असे काही प्रश्न नेटकऱ्यांना पडले होते. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नव्या पोस्टमधून नेटकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहे


अमृता आणि तेजस्विनीमध्ये उडाले खटके; बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये काय होणार?


छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  BFF असणाऱ्या अमृता धोंगडे (Amruta Dhongade) आणि तेजस्विनीमध्ये (tejasvini lonkar)  वादाची पहिली ठिणगी पडणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे कि, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या मुद्द्यावरून भडकली. याच वरून दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. तेजस्विनी तू आता काय करते आहेस ? त्यावर तेजस्विनी म्हणाली, 'ही पध्दत नव्हे'  त्यावर अमृताचा पारा चढला. " हो हीच पद्धत आहे आता" असे अमृताने तेजस्विनीला ठणकावून सांगितले.


शिव ठाकरे म्हणतो, 'माझ्या 169 गर्लफ्रेंड होत्या...'; बिग बॉसमधील वक्तव्याची चर्चा


छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान (Salman Khan) करतो. वीकेंड का वारमध्ये सलमान स्पर्धकांसोबत चर्चा करतो. या सीझनमध्ये प्रेक्षकांना स्पर्धकांची भांडणं, टास्क आणि ड्रामा हे सर्व बघायला मिळत आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये स्पर्धक शिव ठाकरेनं (Shiv Thakare) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. शिवनं सांगितलं की, त्याला 169 गर्लफ्रेंड होत्या, त्याच्या या वक्तव्यानं अनेकांचं लक्ष वेधलं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.