Entertainment News Live Updates 15 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 15 Nov 2022 03:35 PM
Siddhaanth Vir Surryavanshi: 'मला तुमची आठवण येते...' सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर मुलीची भावनिक पोस्ट

Siddhaanth Vir Surryavanshi: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचं (Siddhaanth Vir Surryavanshi) निधन झालं. जीममध्ये वर्कआऊट करताना सिद्धांतला हृदयविकाराचा झटका आला.  सिद्धांतनं वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नुकतीच सिद्धांतची मुलगी डिजा सूर्यवंशीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं वडिलांसोबतचे काही फोटो शेअर केले. या पोस्टला सिद्धांतनं खास कॅप्शन देखील दिलं. 



Bipasha Basu : बिपाशाला मिळाला डिस्चार्ज

Bipasha Basu : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने (Bipasha Basu) 12 नोव्हेंबर 2022 रोजी एका गोड मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंह ग्रोवरला (Karan Singh Grover) कन्यारत्न झाल्याने त्यांचे चाहते प्रचंड खूश झाले आहेत. अशातच आता बिपाशाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.





Shah Rukh Khan : शाहरुखनं उडवली रणबीरची खिल्ली

Shah Rukh Khan And Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दोन्ही सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेते आहेत. रणबीर नुकताच बाबा झाल्यामुळे सध्या चर्चेत आहे. तर दुसरीकडे शाहरुख त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. दोन्ही अभिनेते अनेकदा एकमेकांची टिंगल करताना दिसून येतात. 

Swara Bhasker: 'त्या राक्षसाला...' श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया

Swara Bhaskerश्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. दिल्लीतील (Delhi) मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. हे तुकडे त्यानं फ्रीजमध्ये ठेवले. आफताबनं केलेल्या या अमानुष हत्येवर देशभरातून संताप व्यक केला जात आहे. नुकतच अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये तिनं, हे प्रकरण किती भयानक, भीषण आणि दुःखद आहे.' असं लिहिलं आहे. 



Yashoda Box Office Collection Day 4: देशातच नाही तर परदेशातही समंथाची हवा; 'यशोदा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?

Yashoda Box Office Collection Day 4: फक्त देशभरातीलच नाही तर परदेशातील सिनेमागृहात देखील यशोदा हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अमेरिकेमध्ये या चित्रपटानं 445 हजार डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे.  तर भारतामध्ये यशोदा चित्रपटानं सोमवारी (14 नोव्हेंबर) 1.35- 1.45 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटानं भारतामध्ये 12 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. 





Saleel Kulkarni : 'अन् अचानक समोर गोकुळधाम दिसलं'; सलील कुलकर्णींची पोस्ट व्हायरल

Saleel Kulkarni On Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच मंडळी ही मालिका आवडीने पाहतात. गेल्या काही वर्षांत ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे. अशातच या मालिकेसंदर्भातली सलील कुलकर्णींची पोस्ट व्हायरल होत आहे. 





Katrina Kaif : कतरिना कैफ देणार गुड न्यूज? बेबी बंपने वेधलं चाहत्यांचं लक्ष

Katrina Kaif Pregnancy : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या तिच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे कतरिनाच्या बेबी बंपने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या (Vicky Kaushal) घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची चर्चा आहे. 





Mayur Vakani: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्यानं तयार केला नरेंद्र मोदींचा पुतळा; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Mayur Vakani: अभिनेता मयूर वकानीनं (Mayur Vakani) 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेमध्ये सुंदर ही भूमिका साकारली. मयूरला या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मयूर सध्या त्याच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. मयूरनं नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याचा फोटो मयूरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. मयूरच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 



Alia Bhatt : लेकीच्या जन्मानंतर 'मम्मा' आलियानं शेअर केला पहिला फोटो

Alia Bhatt Latest Pic : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) घरी छोट्या पाहुणीचं आगमन झालं आहे. आलियाने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. आलियाच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच आलियाने लेकीच्या जन्मानंतर पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 





Shubhman Gill: सारा आली खानसोबत डेटिंगच्या चर्चेवर क्रिकेटपटू शुभमन गिलनं सोडलं मौन; म्हणाला...

Shubhman Gill: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. सारा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. काही दिवसांपूर्वी सारानं कॉफी विथ करण (Koffee With Karan) या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये सारानं तिच्या क्रशबाबत सांगितलं होतं. पण अभिनेत्याला नाही तर सारा एका क्रिकेटरला डेट करत आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. सारा अनेकदा क्रिकेटर शुभमन गिलसोबत (Shubhman Gill) स्पॉट झाली आहे. आता सारासोबतच्या डेटिंगच्या चर्चेवर शुभमननं मौन सोडलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ghattamaneni Krishna Passed Away : सुपरस्टार महेश बाबूचं पितृछत्र हरपलं

Ghattamaneni Krishna Passed Away : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांचे वडिल कृष्णा घट्टामनेनी (Krishna Ghattamaneni) यांचे निधन झाले आहे. हैदराबादमधील कॉन्टिनेन्टल रुग्णालयात वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते होते. 





Jacqueline Fernandez : जॅकलिनच्या अडचणी वाढणार? जामिनावर आज निकाल

Jacqueline Fernandez Bail : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या काही दिवसांपासून 200 कोटींच्या मनी लॉंड्रिग प्रकरणामुळे चर्चेत आहे. जॅकलिनच्या जामिनाचा आदेश आज सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे जॅकलिनला जामिन मिळणार की अटक होणार हे आज स्पष्ट होणार आहे. 

Aamir Khan : आमिर खानने सिनेसृष्टीपासून घेतला ब्रेक; म्हणाला...

Aamir Khan Taking Break From Films : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खानने (Aamir Khan) आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. आमिरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतात. पण गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला त्याचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. त्यामुळेच आमिरने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


इव्हेंटमध्ये बेशुद्ध पडलेल्या चाहतीच्या मदतीला धावला वरुण धवन


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) चाहता वर्ग मोठा आहे. वरुणचा  भेडीया (Bhediya) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबतच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. वरुण आणि क्रिती हे सध्या भेडीया या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी क्रिती आणि वरुणनं जयपूरमधील एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. जयपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या इव्हेंटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 


काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज


अभिनेत्री काजोलच्या (Kajol) ‘सलाम वेंकी’ (Salaam Venkey) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. बालदिनाच्या निमित्तानं हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काजोलसोबतच विशाल जेठवा  (Vishal Jethwa), राजीव खंडेलवाल, प्रकाश राज आणि अहना कुमरा यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री रेवती यांनी केलं आहे. ‘सलाम वेंकी’ च्या ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 


'शाब्बास सुनबाई' आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला


गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आजपासून 'शाब्बास सुनबाई' (Shabbas Sunbai) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रवाहाविरुद्ध हिंमतीने पोहू पाहणाऱ्या एका ध्येयवादी सूनेची म्हणजेच संजीवनीची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. 'शाब्बास सुनबाई' ही मालिका कौटुंबिक आणि पारंपरिक प्रथा, विचार व रूढींना वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या सुनेची आहे. लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या संजीवनीला आयुष्यात खूप काही साध्य करायचंय. त्यासाठी तिच्या बाबांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिलंय. तिच्या बाबांनी सतत तिच्या मनावर हेच बिंबवलं आहे की तिने सतत पहिलं यावं आणि सर्वोत्कृष्ट असावं. तिने तिच्या वडलांच्या स्वप्नाला आपलसं करत नेहमीच अभ्यासात अव्वल नंबर पटकावत स्वतःचं शैक्षणिक वर्षांत नाव कमावलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.